शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

एका तपात ४१६ शेतकऱ्यांनी संपविले जीवन

By admin | Updated: August 12, 2014 23:40 IST

निसर्गाची अवकृपा, वाढती महागाई, मजुरांचा तुटवडा तसेच शासन, प्रशासनाचे शेतीकडे झालेले दुर्लक्ष यामुळे दिवसेंदिवस शेती व्यवसाय डबघाईस आला आहे. शेतकरी शेती करताना नाकीनऊ येत आहे.

चंद्रपूर : निसर्गाची अवकृपा, वाढती महागाई, मजुरांचा तुटवडा तसेच शासन, प्रशासनाचे शेतीकडे झालेले दुर्लक्ष यामुळे दिवसेंदिवस शेती व्यवसाय डबघाईस आला आहे. शेतकरी शेती करताना नाकीनऊ येत आहे. त्यामुळे कधी बँकेचे, बचत गटाचे तर, कधी सावकारी कर्ज घेऊन दरवर्षी नव्या आशेने शेतकरी शेती करतात. मात्र त्यांच्या खात्यात नैराश्यच येत आहे. कर्जाचा डोंगर सतत वाढल्याने अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत. मागील १२ वर्षांत जिल्ह्यातील तब्बल ४१६ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे.जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये २००३ पासून जुलै २०१४ पर्यंत एकूण ४१६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यातील २८६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या शासनाने पात्र ठरविल्या आहे. त्यांना २ कोटी ८६ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे.बेभरोवशाचा व्यवसाय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेती व्यवसायातून शेतकऱ्यांना अनेक अडचणींना समोर जावे लागते. त्यातच प्रशासकीय अडचणीही कमी नाही. जिल्ह्यात सिंचन क्षेत्र कमी आहे. ज्या शेतकऱ्यांनी सिंचनाची सोय केली त्यांना वीज मिळत नसल्याची स्थितीही आहे. निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची तर, स्थिती बिकट आहे. त्यामुळे यावर्षी नाही तर, पूढील वर्षी उत्पन्न होईल, या आशेवर शेतकरी शेती करतात. मात्र काही वेळा त्यांना यातून मार्ग काढता येत नाही. त्यातच अनेकजण आपले जीवन संपवत आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासकीय मदत मिळण्यासाठीही अनेक अडचणी येतात. जिल्हा समितीद्वारे प्रथम आत्महत्येचे कारण शोधल्या जाते. या समितीमध्ये १४ सदस्यांचा समावेश आहे.त्यानंतर पूर्ण माहिती गोळा केल्यानंतर आर्थिक मदत दिल्या जाते. ४१६ शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये १८६ शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी पात्र तर, १२८ शेतकऱ्यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. यातील २ प्रकरणांची चौकशी सुरु आहे. आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने ठोस पाऊले उचलणे गरजेचे आहे. (नगर प्रतिनिधी)