राजुरा तहसील कार्यालयात दुपारी १२ वाजता अनुसूचित क्षेत्रातील ३२ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले. अनुसूचित जमाती महिला- पांढरपौनी, हरदोना खु. भेदोडा, लक्कडकोट, कोष्टाळा, डोंगरगाव, सुबई, येरगव्हाण, भुरकुंडा खु. ईसापूर मानोली खुर्द, नोकारी खुर्द, साखरी, सिर्सी, मानोली बुज, कावडगोंदी तर मंगी बु. वरूर रोड, सोनुर्ली, सोंडो, विरूर स्टेशन, भेंडाळा, अंतरगाव, देवाडा, भुरकुंडा बु. जामणी, सोनापूर, भेंडवी, अहेरी, गोयेगाव, टेंभुरवाही ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनु. जमाती सर्वसाधारणसाठी आरक्षित झाले आहे. कोरपना तालुक्यात अनु. जमाती महिला- हिरापूर, बिबी, नांदा, पिपर्डा, वनसडी, येरगव्हाण, वडगाव, चनई बु. रूपापेठ, परसोडा, दुगार्डी, उपरवाही तसेच थुट्रा, लखमापूर, पिंपळगाव, सोनुर्ली, बेलगाव, खिर्डी, मांडवा, सावलहिरा, पारडी, कोठोडा बु. मांगलहिरा, खैरगाव या ग्रामपंचायतींचे सरपंचपद अनु. जमाती सर्वसाधारणसाठी आरक्षित झाल्याची घोषणा तहसीलदारांनी केली.
बॉक्स
‘त्या’ ३६ ग्रामपंचायतींचीही आरक्षण सोडत
जिवती : तालुक्यातील परमडोली या एकाच ग्रामपंचायतची निवडणूक झाली. येथील सरपंचपद ‘सर्वसाधारण महिला’साठी आरक्षित झाले. बिगर अनुसूचित १० व अनुसूचित क्षेत्रातील २६ अशा ३६ ग्रामपंचायतींची मुदत मे-जून महिन्यात संपल्यानंतर २०२१-२०२५ वर्षाकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींच्याही सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले. बिगर अनुसूचित क्षेत्रातील परमडोली देवलागुडा सर्वसाधारण महिला, पिट्टीगुडा नं १-नामाप्र, पुनागुडा-अनु. जाती महिला, नोकेवाडा सर्वसाधारण, कुंबेझरी अनु. जाती सार्वसाधारण, दमपूर मोहदा अनू. जाती, पिट्टीगुडा २- नामाप्र महिला, पुडीयाल मोहदा-अनु. जमाती, चिखली खु- नामाप्र आदी ग्रा. पं. समावेश आहे. अनुसूचित क्षेत्रातील भोक्सापूर, शेणगाव, चिखली बु, मरकागोंदी, खडकी रायपूर, मरकलमेटा, टेकामांडवा, धोंडअजुर्नी, येलापूर, माराईपाटण, शेडवाही बाबापूर, नंदपा, केकेझरीचे सरपंचपद अनु. जमाती महिलासाठी राखीव आहे. खडकी हिरापूर, पाटण, राहपली खु, आंबेझरी, कोदेपूर, गुडशेला, आसापूर, येरमी येसापूर, भारी, सोरेकसा, लांबोरी, धनकदेवी, शेडवाही कमलापूर येथील सरपंचपदासाठी अनु. जमाती सर्वसाधारण प्रवर्गाला संधी मिळाली आहे.