जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २२ हजार ८१९ वर पोहोचली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २२ हजार १५२ झाली आहे. सध्या २८७ बाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एक लाख ८८ हजार ४८७ नमुन्यांची तपासणी केली. त्यापैकी एक लाख ६३ हजार ९२९ नमुने निगेटिव्ह आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत ३८० बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३४५, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १९, यवतमाळ १२, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
आज बाधित आढळलेल्या ४१ रुग्णांमध्ये चंद्रपूर मनपा क्षेत्रातील २३, चंद्रपूर तालुका चार, बल्लारपूर तीन, भद्रावती दोन, ब्रह्मपुरी एक, चिमूर दोन, वरोरा दोन, कोरपना दोन, जिवती एक व इतर ठिकाणच्या एका रुग्णाचा समावेश आहे.