शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
2
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
3
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
4
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
5
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
6
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
7
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

डोस संपल्याने जिल्हाभरातील ४०० लसीकरण केंद्रे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 05:00 IST

कोरोना लसीकरणासाठी जिल्हा प्रशासनाने ४१३ केंद्रे तयार केली. चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातही ४० पेक्षा जास्त केंद्रे सुरू आहेत. मात्र, पुरेसे डोस मिळत नसल्याने केंद्र बंद ठेवावी लागत आहेत. दुसरा डोस घेणाऱ्या ४५ व ६० वर्षांवरील नागरिकांना कालावधी पूर्ण होऊनही लस मिळत नसल्याने शहरातील केंद्रांवर भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे. पुरेसे डोस मिळाले असले तर लस घेणाऱ्यांची संख्या वाढली असती.

ठळक मुद्देनागरिकांत रोष : पुरेसे डोस मिळत नसल्याने आरोग्य यंत्रणाही हतबल

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना प्रतिबंधक लस घेणाऱ्या जिल्ह्यातील प्राधान्य वयोगट लक्षात घेऊन त्यानुसार लस पुरवठ्याचे सूत्र ठरविणे अत्यावश्यक आहे. मात्र, असे कोणतेही सूत्र न ठरविता वरिष्ठ स्तरावरून अत्यल्प लस पुरवठा केला जात आहे. पहिला व दुसरा डोस घेणारे शेकडो नागरिक आल्या पावली परत जात आहेत. गुरुवारी सात-साठ केंद्रांचा अपवाद वगळल्यास लस उपलब्ध नाही. परिणामी, जिल्ह्यातील सुमारे ४०० केंद्रे आरोग्य प्रशासनाला नाईलाजास्तव बंद ठेवावी लागणार आहेत.कोरोना लसीकरणासाठी जिल्हा प्रशासनाने ४१३ केंद्रे तयार केली. चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातही ४० पेक्षा जास्त केंद्रे सुरू आहेत. मात्र, पुरेसे डोस मिळत नसल्याने केंद्र बंद ठेवावी लागत आहेत. दुसरा डोस घेणाऱ्या ४५ व ६० वर्षांवरील नागरिकांना कालावधी पूर्ण होऊनही लस मिळत नसल्याने शहरातील केंद्रांवर भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे. पुरेसे डोस मिळाले असले तर लस घेणाऱ्यांची संख्या वाढली असती.

पाच लाख ५४ हजार ३३ जणांनी घेतली लसआरोग्य विभागाकडून लस मिळाल्यानंतर सकाळी दहा वाजता लसीकरणाला सुरुवात होते. नागरिकांनी गर्दी करू नये, यासाठी चंद्रपूर मनपाने कुपन पद्धत सुरू केली. केंद्रात जेवढे डोस आले तेवढीच कुपन आधी वितरण केली जातात. नागरिक पहिल्यांदा कुपनसाठी रांगा लावतात. बऱ्याचदा केंद्रात लस किती उपलब्ध आहे, हे आरोग्य पथकाकडून सांगितले जात नाही. पण, कुपन वाटणे सुरूच असते. त्यामुळे केंद्रात १०० लस उपलब्ध असताना २०० ते २५० नागरिक केवळ कुपनसाठी रांग लागतात. आतापर्यंत जिल्ह्यात पाच लाख ५४ हजार ३३ जणांनी लस घेतली आहे.

ज्येष्ठ नागरिकांना मन:स्ताप६० वर्षांवरील नागरिकांना लस घेण्यासाठी उपलब्ध डोसनुसार चंद्रपूर मनपा क्षेत्रात तीन किंवा चार केंद्रे सुरू असतात. त्यातही आता १८ ते ४४ गटासाठीच तीन केंद्रे सुरू आहेत. परंतु, जास्त डोस मिळत नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना निराश होऊन घरी परत जावे लागते. १८ वर्षांवरील तरूणही तात्कळत आहेत.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या