शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरातील जखमी वाघाजवळ ४० वन कर्मचाऱ्यांचा पहारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 13:50 IST

राजकुमार चुनारकर।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चिमूर वन परिक्षेत्रातील मूरपार उपक्षेत्रांतर्गत भान्सुली बिटातील कक्ष क्रमांक पाचमध्ये आढळलेला वाघ अद्याप तवालाजवळच बसून आहे. तो वृद्ध असून जखमीही आहे. वनविभागाने त्याला जेरबंद करण्यासाठी केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले असून ४० वन कर्मचारी अहोरात्र वाघावर पहारा ठेवून आहेत.गुरुवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास तो तलावात जावून ...

ठळक मुद्देवनविभागाकडून चाचपणी जखमी असल्याचा वरिष्ठांना अहवाल

राजकुमार चुनारकर।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चिमूर वन परिक्षेत्रातील मूरपार उपक्षेत्रांतर्गत भान्सुली बिटातील कक्ष क्रमांक पाचमध्ये आढळलेला वाघ अद्याप तवालाजवळच बसून आहे. तो वृद्ध असून जखमीही आहे. वनविभागाने त्याला जेरबंद करण्यासाठी केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले असून ४० वन कर्मचारी अहोरात्र वाघावर पहारा ठेवून आहेत.गुरुवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास तो तलावात जावून पाणी प्याला आणि नंतर पुन्हा तिथेच जाऊन बसला.याची चित्रफित व पशु चिकित्सकाचा अहवाल मुख्य वन संरक्षकांकडे पाठविल्याचे वन विभागाने सांगितले. त्याच्या जखमा व पशु चिकित्सकांच्या अहवालाचे निरीक्षण करून वाघाला सुन्न करण्याचे इंजेक्शन देण्याची परवानगी पी.सी.सी.एफ. नागपूर यांनी दिली तरच त्याच्यावर उपचार केले जातील.

त्या बोकडावर बिबट्याचा ताव मारण्याचा प्रयत्नजखमी वाघाला पकडण्यासाठी त्याच्याजवळ् बांधून ठेवलेल्या बोकडावर रात्री २ वाजताच्या सुमारास एका बिबट्याने ताव मारण्याचा प्रयत्न केला. ही बाब जखमी वाघावर पाळत ठेवून असलेल्या वन कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी बिबट्याला तेथून हाकलून लावले.

वाघाच्या मृत्यूची प्रतीक्षा ?वन्य जीव कायदा १९७२ अंतर्गत जखमी वन्य प्राण्यावर प्राथमिक उपचार करणे बंधनकारक असल्याचे जाणकार बोलत आहे. मात्र ४८ तासानंतरही या जखमी वाघावर कुठलेही प्राथमिक उपचार करण्यात आले नाही. वन विभाग या जखमी वाघाच्या मृत्यूची वाट तर बघत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.वाघाच्या जखमा तो घेत असलेल्या विश्रांतीने बरा होणारा आहे वा नाही याची शहानिशा वनविभाग करीत आहे. जखमा उपचाराअंतीच बऱ्या  होणाऱ्या असतील, तरच त्याला सुन्न करण्याचे इंजेक्शन देण्याची परवानगी मिळते.- विजय शेळके, मुख्य वनसंरक्षक, वनविभाग, चंद्रपूर.

टॅग्स :Tigerवाघ