लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासात १९९ बाधित पुढे आले. त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या ८ हजार २८९ झाली आहे. यापैकी मंगळवारपर्यंत ४ हजार ७५४ कोरोना बाधितांना सुटी देण्यात आली. ३ हजार ४१३ कोरोना बाधितांवर सध्या उपचार सुरू आहे. आज चौघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबाधित मृतकांची संख्या १२२ झाली आहे.आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, २४ तासांमध्ये चार कोरोना बाधितांचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये चंद्रपुरातील सरकार नगर येथील ८९ वर्षीय पुरूष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला ६ सप्टेंबरला क्राईस्ट हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. दुसरा मृत्यू बाबूपेठ चंद्रपूर येथील ६७ वर्षीय पुरूष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला १७ सप्टेंबरला क्राईस्ट हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले होते. तिसरा मृत्यू बालाजी वार्डातील ६८ वर्षीय महिला बाधितेचा झाला आहे. या बाधितेला १८ सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय येथे भरती करण्यात आले होते. चौथा मृत्यू बल्लारपूर गांधी वार्डातील ६२ वर्षीय पुरूष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला १५ सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. मृत्यू झालेल्या बाधितांना कोरोनासह मधुमेह व न्युमोनिया होता. जिल्ह्यात आतापर्यंत १२२ कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यापैकी, चंद्रपूर ११५, तेलंगणा व बुलडाणा प्रत्येकी एक, गडचिरोली दोन आणि यवतमाळ येथील तीन बाधितांचा समावेश आहे.२४ तासात चंद्रपूर व बल्लारपुरात सर्वाधिक रूग्णजिल्ह्यात २४ तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्र्रपूर शहर व परिसरातील ९६ बाधित, पोंभूर्णा तालुक्यातील चार, बल्लारपूर तालुका २८, चिमूर तालुका तीन, मूल तीन, गोंडपिपरी तालुका दोन, कोरपना एक, ब्रह्मपुरी तालका ७, नागभीड तालुका १०, वरोरा तालुका १८, भद्रावती ६, सावली दोन, सिंदेवाही ९, राजुरा तालुका १० असे एकूण १९९ बाधित पुढे आले आहे. चंद्रपूर शहरातील संजय नगर, शंकर नगर, सरकार नगर, दुर्गापूर, इंदिरानगर, बाबूपेठ, नगीना बाग, रामनगर, विठ्ठल मंदिर वार्ड, दादमहल वार्डात
४ हजार ७५४ रूग्णांची कोरोना महामारीवर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 05:00 IST
आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, २४ तासांमध्ये चार कोरोना बाधितांचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये चंद्रपुरातील सरकार नगर येथील ८९ वर्षीय पुरूष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला ६ सप्टेंबरला क्राईस्ट हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. दुसरा मृत्यू बाबूपेठ चंद्रपूर येथील ६७ वर्षीय पुरूष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला १७ सप्टेंबरला क्राईस्ट हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले होते.
४ हजार ७५४ रूग्णांची कोरोना महामारीवर मात
ठळक मुद्देनवे रूग्ण १९९ : चौघांचा मृत्यू, ३ हजार ३१३ जणांवर उपचार सुरू