शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

३८४ पिस्तूल पोलिसांकडे जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 22:32 IST

लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू होताच जिल्ह्यातील शस्त्र परवानाधारकांकडून ४६८ पिस्तुल व रिव्हॉलव्हर तातडीने जमा करण्याची कार्यवाही जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी केली. उर्वरित ८४ परवानाधारकांनाही शस्त्र परत करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत.

ठळक मुद्दे८४ परवानाधारकांना नोटिसा : जिल्ह्यात ४५६ शस्त्र परवाने

राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू होताच जिल्ह्यातील शस्त्र परवानाधारकांकडून ४६८ पिस्तुल व रिव्हॉलव्हर तातडीने जमा करण्याची कार्यवाही जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी केली. उर्वरित ८४ परवानाधारकांनाही शस्त्र परत करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत.जिल्ह्यात शेतातील पिकांचे संरक्षण, आर्थिक व वैयक्तिक सुरक्षेच्या कारणास्तव पिस्तुल, रिव्हॉलवर आणि दुबार बंदुकीचे परवानाने जिल्हाधिकाऱ्यांकडून दिले जातात. याकरिता पोलीस ठाण्यासह पोलीस अधीक्षकांचे नाहरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. गृह विभागाने लागू केलेल्या सर्व अटी व शर्ती पूर्ण करणाºया व्यक्तीला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शस्त्र परवाना दिला जातो. जिल्ह्यात सद्यस्थितीत ५४२ शस्त्र परवाने आहेत.निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी परवानाधारकांकडील शस्त्रे पोलिसांकडे जमा केली जातात. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २३ फेबु्रवारी २०१९ ला जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती.या बैठकीत जिल्ह्यातील परवानाधारकांना त्यांच्याकडील शस्त्र तातडीने जमा करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार सोमवारी ३८४ परवानाधारकांनी संबंधित पोलीस ठाण्यात स्वत:जवळील शस्त्रे जमा केली. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर ही शस्त्रे परत केली जाणार आहेत.आचारसंहितेतून बँक, उद्योगांना वगळलेजिल्ह्यातील विविध बँका, वेकोलि, अल्ट्राटेक, माणिकगड, एसीसी सिमेंट कंपनी, बल्लारपूर व स्पोर्ट भद्रावती येथे तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांनी एकूण ७४ शस्त्रांची परवानगी दिली आहे. आर्थिक व मोठ्या उद्योगाशी संबंधित असणाºयाना आणि राजकीय घडामोडींशी कोणताही संबंध नसणाºया या परवानाधारकांना शस्त्र जमा करण्याच्या नियमातून वगळण्यात आले आहे.नेत्यांना ठाण्यात करावी लागते नोंदआत्मसंरक्षणार्थ शस्त्र बाळणाऱ्या राजकीय नेत्यांनाही निवडणूक आचारसंहितेच्या काळात ठाण्यात शस्त्र जमा करावे लागते. परंतु, काही शर्थींचे पालन करून स्वत:कडे शस्त्र ठेवायचे असेल तर ठाण्याच्या हद्द ओलांडताच दुसºया ठाण्यात या शस्त्राची नोंद करावीच लागते, असा नियम आहे.शस्त्र परवान्याचे अर्ज फेटाळलेतत्कालिन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल कार्यरत असताना जिल्ह्यातील काही बड्या व्यक्तींनी शस्त्र परवाना मिळावा, यासाठी जीवाचा आटापिटा केला होता. याकरिता आर्थिकदृष्ट्या तगड्या व्यक्तींनी दबाव तंत्राचाही वापर केला. परंतु, जिल्हाधिकारी सलिल बधले नाहीत. हा दबाव झुगारून शस्त्र परवान्याचे अर्ज फेटाळले. त्यामुळे आत्मसंरक्षणार्थ शस्त्रांची संख्या जिल्ह्यात ४५६ च्या पुढे गेली नाही.असा होतो परवाना रद्दआत्मसंरक्षणार्थ शस्त्र बाळगणाच्या प्रकरणावरून गणेश ऊर्फ भाई तिलवे विरूद्ध जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग व इतर यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने सुनावणी केली. दरम्यान, मार्गदर्शकतत्त्व तयार केल्यानंतरच राज्य सरकारने परवाने द्यावे, असा आदेश न्यायालयाने दिला होता. त्यानुसार गृह विभागाने अटी व शर्थी तयार केल्या. परवाना देण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे. पण रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची समिती संयुक्त निर्णय घेते.