शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएससी परीक्षेला ३८ टक्के विद्यार्थ्यांनी फिरवली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:25 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २८ पदांच्या २७० जागांसाठी एमपीएसी राज्यसेवा सामाईक परीक्षेची जाहिरात २०१९ ला निघाली होती. जाहिरातीनुसार ही परीक्षा ...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २८ पदांच्या २७० जागांसाठी एमपीएसी राज्यसेवा सामाईक परीक्षेची जाहिरात २०१९ ला निघाली होती. जाहिरातीनुसार ही परीक्षा ५ एप्रिल २०२० रोजी होणे अपेक्षित होते. परंतु, विविध कारणाने ही परीक्षा सतत समोर ढकलण्यात आली. मात्र युवकांनी आंदोलन केल्यानंतर २१ मार्च रोजी ही परीक्षा शहरातील १३ परीक्षा केंद्रावर सकाळी १० ते १२ व दुपारी ३ ते ५ या वेळेत घेण्यात आली. शहरातील परीक्षा केंद्रावर ३ हजार ९३८ परीक्षार्थी परीक्षा देणार होते. पहिल्या पेपरसाठी २,४२१ परीक्षार्थी हजर तर १,५०३ परीक्षार्थी गैरहजर होते. तर दुसऱ्या पेपरसाठी २,४२१ परीक्षार्थी हजर तर १,५१७ परीक्षार्थी गैरहजर होते. शहरातील सर्व केंद्रावर शांततेत परीक्षा पार पडली असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

बॉक्स

४०० कर्मचाऱ्यांची चमू

शहरातील १३ ही परीक्षा केंद्रावर शांतते परीक्षा पार पडावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. यामध्ये समन्वय अधिकारी, उपकेंद्रप्रमुख, पर्यवेक्षक, समवेक्षक, लिपिक, शिपाई असे जिल्हाधिकारी कार्यालयातील साधारणात: ३०० कर्मचारी परीक्षा केंद्रावर तैनात होते. तसेच परीक्षा केंद्राच्या बाहेर व आतमध्ये साधारणत: १०० पोलीस तैनात होते. त्यामुळे जिल्ह्यात एमपीएससी परीक्षा शांततेत पार पडली.

बॉक्स

थर्मल गनद्वारे तपासणी

एमपीएससीतर्फे एका खासगी कंपनीला कंत्राट देऊन विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी प्रत्येक परीक्षार्थीची मेटल डिटेक्टर, थर्मल गनद्वारे तपसाणी करण्यात आली. परीक्षार्थ्यांना मास्क सॅनिटायझर, ग्लोव्हज अशी सुरक्षा किट आयोगाकडून पुरविण्यात आली. परीक्षा हॉलवर बारकोड तपासणी झाल्यानंतरच प्रवेश देण्यात आला.