शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
3
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
4
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
5
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
6
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
7
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
8
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
9
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
10
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
11
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
12
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
13
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
14
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
15
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
16
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
17
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
18
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
19
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
20
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार

एमपीएससी परीक्षेला ३८ टक्के परीक्षार्थ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 05:00 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २८ पदांच्या २७० जागांसाठी एमपीएसी राज्यसेवा सामाईक परीक्षेची जाहिरात २०१९ ला निघाली होती. जाहिरातीनुसार ही परीक्षा ५ एप्रिल २०२० रोजी होणे अपेक्षित होते. परंतु, विविध कारणाने ही परीक्षा सतत समोर ढकलण्यात आली. मात्र युवकांनी आंदोलन केल्यानंतर २१ मार्च रोजी ही परीक्षा शहरातील १३ परीक्षा केंद्रावर सकाळी १० ते १२ व दुपारी ३ ते ५ या वेळेत घेण्यात आली.

ठळक मुद्देचंद्रपुरात १३ केंद्रावर परीक्षा : ३९३८ पैकी १५०३ परीक्षार्थी गैरहजर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सतत सहा वेळा समोर ढकलण्यात आलेली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा रविवारी चंद्रपूर शहरातील १३ केंद्रावर पार पडली. या परीक्षेला ३८ टक्के परीक्षार्थ्यांनी पाठ फिरवली. नागपूर विभागातून एमपीएससी परीक्षेसाठी चंद्रपूर शहरातील १३ परीक्षा केंद्रांवर ३ हजार ९३८ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी पहिल्या पेपरला १,५०३ तर दुसऱ्या पेपरला १,५१७ परीक्षार्थी गैरहजर असल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने केली.  महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २८ पदांच्या २७० जागांसाठी एमपीएसी राज्यसेवा सामाईक परीक्षेची जाहिरात २०१९ ला निघाली होती. जाहिरातीनुसार ही परीक्षा ५ एप्रिल २०२० रोजी होणे अपेक्षित होते. परंतु, विविध कारणाने ही परीक्षा सतत समोर ढकलण्यात आली. मात्र युवकांनी आंदोलन केल्यानंतर २१ मार्च रोजी ही परीक्षा शहरातील १३ परीक्षा केंद्रावर सकाळी १० ते १२ व दुपारी ३ ते ५ या वेळेत घेण्यात आली. शहरातील परीक्षा केंद्रावर ३ हजार ९३८ परीक्षार्थी परीक्षा देणार होते. पहिल्या पेपरसाठी २,४२१ परीक्षार्थी हजर तर १,५०३ परीक्षार्थी गैरहजर होते. तर दुसऱ्या पेपरसाठी २,४२१ परीक्षार्थी हजर तर १,५१७ परीक्षार्थी गैरहजर होते. शहरातील सर्व केंद्रावर शांततेत परीक्षा पार पडली असल्याची माहिती प्रशासनाने दिली.  

४०० कर्मचाऱ्यांची चमूशहरातील १३ ही परीक्षा केंद्रावर शांतते परीक्षा पार पडावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. यामध्ये समन्वय अधिकारी, उपकेंद्रप्रमुख, पर्यवेक्षक, समवेक्षक, लिपिक, शिपाई असे जिल्हाधिकारी कार्यालयातील साधारणात: ३०० कर्मचारी परीक्षा केंद्रावर तैनात होते. तसेच परीक्षा केंद्राच्या बाहेर व आतमध्ये साधारणत: १०० पोलीस तैनात होते. त्यामुळे जिल्ह्यात एमपीएससी परीक्षा शांततेत पार पडली. थर्मल गनद्वारे तपासणीएमपीएससीतर्फे एका खासगी कंपनीला कंत्राट देऊन विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी प्रत्येक परीक्षार्थीची मेटल डिटेक्टर, थर्मल गनद्वारे तपसाणी करण्यात आली. परीक्षार्थ्यांना मास्क सॅनिटायझर, ग्लोव्हज अशी सुरक्षा किट आयोगाकडून पुरविण्यात आली. परीक्षा हॉलवर बारकोड तपासणी झाल्यानंतरच प्रवेश देण्यात आला.

 

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षा