शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

डोमा येथे विविध रोगाने ३५० शेळ्यांचा मृत्यू

By admin | Updated: May 21, 2017 00:35 IST

येथून जवळ असलेल्या डोमा येथे विविध रोगाने १५ दिवसांत ३५० शेंळ्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पशुधन नष्ट होत होते.

पशुचिकित्सा शिबिर : रोशन ढोक यांचा पुढाकारलोकमत न्यूज नेटवर्कशंकरपूर : येथून जवळ असलेल्या डोमा येथे विविध रोगाने १५ दिवसांत ३५० शेंळ्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पशुधन नष्ट होत होते. ही बाब पंचायत समितीचे सदस्य रोशन ढोक यांना मिळताच त्यांनी पुढाकार घेऊन डोमा येथे पशुचिकीत्सा शिबिराचे आयोजन केले. व त्यामध्ये शेळ्यांची तपासणी करुन त्याच्यावर उपचार करण्यात आले.डोमा गावात बहूतेक शेतकरी शेळी पालनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करतात.परंतु, मागील पंधरा दिवसांपासून शेळ्यांना हगवण व विविध रोगांची लागण झाली. गावात पशुवैदयकीय दवाखाना नसल्यामुळे शेतकऱ्यांनी घरघुती उपचार करुन खासगी डॉक्टरांची मदत घेतली. मात्र त्याचाही कोणताही फायदा झाला नाही.त्यामुळे १५ दिवसांत ३५० शेळ्या मृत्यूमूखी पडल्या. ही बाब पिंटू मालके यांनी पं.स. सदस्य रोशन ढोक यांच्या निदर्शनात आणून दिली. त्यामुळे रोशन ढोक यांनी पशु चिकित्सा शिबिराचे आयोजन केले. तसेच प्रत्येक शेतकरी व मेंढपाळ यांच्या घरी जाऊन शेळीची तपासणी केली. व उपचार केले. या शिबिरात डॉ. बैतूले, शंकरपूर येथील डॉ. मेश्राम, डॉ. तर्पेवार, डॉ. देहारी व इतर पशुधन पर्यवेक्षक आदींनी शेळ्या व पाळीव जनावरांची तपासणी केली. या शिबीरात ९५७ शेळ्या व व इतर पाडीव जनावरावरांची तपासणी करुन उपचार करण्यात आले. केले. यावेळी प.स.सदस्य भावना बावणकर, बाजार समितीचे संचालक अमोद गौरकर संस्कृती विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप गारघाटे, पिंटू मालके आदी उपस्थित होते.लवकरच पावसाळा सुरू होणार आहे. त्या काळात पशुंवर रोगांचे आक्रमण होत असते. मात्र, त्यापूर्वी डोमा येथील शेळ्यांवर अज्ञात रोगाने आक्रमण केल्याने हे पशुचिकित्सा शिबिर आयोजित करण्याची पाळी आली.पशुवैद्यकीय रुग्णालयाची आवश्यकताडोमा गावात विविध रोगांच्या लागणमुळे ३५० शेळ्याचा मृत्यू झाला. यावेळी उपचार करण्यासाठी अनेक शेतकरी धावपळ करीत होते. मात्र गावात पशुवैद्यकीय रुग्णालय नसल्यामुळे शेळ्यावर वेळेवर उपचार होऊ शकले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले.