शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

३४ वर्षांनी माजी विद्यार्थ्यांचे मनोमिलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 23:27 IST

येथील सीटी हायस्कूलमधून ३४ वर्षांपूर्वी शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात करिअर घडविणाºया माजी विद्यार्थ्यांचा दाताळा मार्गावरील एका लॉनमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला.

ठळक मुद्देसीटी हायस्कूल : जुन्या आठवणींना दिला उजाळा

ऑनलाईन लोकमतचंद्रपूर : येथील सीटी हायस्कूलमधून ३४ वर्षांपूर्वी शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात करिअर घडविणाºया माजी विद्यार्थ्यांचा दाताळा मार्गावरील एका लॉनमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला.चंद्रपुरातील सीटी कॉन्व्हेंट व सीटी हायस्कूलमधून १९७२ ते १९८४ या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेली ही पिढी करिअर घडविण्यासाठी विविध क्षेत्रांची निवड केली. अनेकांनी त्या-त्या क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटविला. दरम्यान, केवळ प्रपंच, नोकरी, व्यवसायातच गुंतून राहिल्याने एकमेकांशी संवाद तुटला होता. हे तुटलेपण पुन्हा साधण्यासाठी नव्या संवाद माध्यमांचा आधार घेण्यात आला. यातून हे माजी विद्यार्थी एकत्र आलेत. रविवारी येथे स्रेहमिलन सोहळा घेवूनजुन्या आठवणींना उजाळा दिला. ज्या शाळेत आपण शिकलो, घडलो, लहानाचे मोठे झालो. त्याच शाळेतील मित्र-मैत्रिणी एकत्र आल्याने आनंदाला उधाण आले होते. मेळाव्याप्रसंगी कॉन्व्हेंटच्या निवृत्त प्राचार्य ज्योती धोटेकर, सीटी हायस्कूलचे निवृत्त शिक्षक एच. एन. जांभुळे यांचा सत्कार करण्यात आला.मेळाव्याला मुंबई, पुणे, नाशिक, भिलाई, नागपूर शहरातून माजी विद्यार्थी आले होते. त्यामध्ये अधिकारी, अभियंता, प्राचार्य, शिक्षक, उद्योजक, राजकारणी, पत्रकार, गृहिणी आदींचा समावेश होता. मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी नृत्य व गायन सादर केले. वैशाली जांभुळे, किरण उपगन्लावार, सानिका ठाकरे, विजय बोनगीरवार, ज्ञानचंद गावंडे, चारुशीला मून, लता चिमूरकर यांच्या सादरीकरणाने विद्यार्थ्यांची मने जिंकली. विविध सत्रांचे संचालन दिनेश मेश्राम, कैलाश मोदी, सुधीर ठाकरे, संजय तायडे यांनी केले.यावेळी विवेक आबोजवार, व्यंकटेश उपगन्लावार, मकरंद घरोटे, संदीप मामीडवार, गिरीधर मेश्राम, प्रताप शिंदे, अतुल शिवणीवार, श्याम राजूरकर, अतुल रायकुंडलिया, गिरीश कोंतमवार, सुधीर माजरे, अविनाश रेशीमवाले, राजेश गुजरकर, संजय ठाकरे, आशिष पुराणिक, अनिता भोसले, संगीता दलाल, वंदना तोमर, अलका सिंघवी, ममता तोमर, अरुणा चुडासमा, जया साळवे, अर्चना इंगळे, कल्पना सिद्धमशेट्टीवार, किरण कुलटे, प्रवीणा मेश्राम, शोभना मेश्राम, उज्ज्वला इथापे, तनुजा रामटेके, भावना पतरंगे आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.