शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

३४ गुणवंत कर्मचाऱ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2017 01:02 IST

महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीमध्ये काम करणाऱ्या ३४ कर्मचाऱ्यांचा कामगार दिनी गौरव करण्यात आला.

चंद्रपूर परिमंडळ : महावितरणमधील उल्लेखनीय कामाची दखलचंद्रपूर : महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीमध्ये काम करणाऱ्या ३४ कर्मचाऱ्यांचा कामगार दिनी गौरव करण्यात आला. १ मे रोजीचे औचित्य साधून चंद्रपूर परिमंडळाच्या कार्यालयात कामगार दिन व महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी हा कार्यक्रम झाला.महावितरणचे कर्मचारी अनेक अडचणींना तोंड देत काम करीत असतात. उल्लेखनीय कार्य करून महावितरणची मान उंचावण्याचा प्रयत्न करीत असतात. या गुणवंत कर्मचाऱ्यांच्या सेवेची दखल घेत चंद्रपूर परिमंडळातील ३४ कर्मचाऱ्यांचा ‘गुणवंत कामगार’ म्हणून परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांच्या हस्ते पुरस्कार, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सत्कार करण्यात आला. त्या गुणवंत कर्मचाऱ्यांत चंद्रपूर मंडळातील १७ व गडचिरोली मंडळातील १७ कर्मचाऱ्याचां समावेश आहे.भारतीय कामगार चळवळीचे जनक रावबहाद्दुर नारायण मेघाजी लोखंडे या थोर कामगार नेत्याच्या प्रतिमेस मुख्य अभियंता घुगल यांच्या समवेत गुणवंत कर्मचाऱ्यांनी माल्यार्पण केले. यावेळी नारायण मेघाजी लोखंडे यांना अधीक्षक अभियंता (चंद्रपूर परिमंडळ )हरीश गजबे , अधीक्षक अभियंता (पायाभूत आराखडा) अनिल घोघरे व सर्व उपस्थितांनी आदरांजली वाहिली. कार्यक्रमाला कार्यकारी अभियंता ए. डी. सहारे, कार्यकारी अभियंता अजय खोब्रागडे, कार्यकारी अभियंता अविनाश कुरेकार, प्रणाली विश्लेषक पंकज साटोने आदी उपस्थित होते. यावेळी मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सर्वांनी भविष्यातही आपापल्या कार्यक्षेत्रात काम करताना ग्राहकांना चांगली सेवा द्यावी. तसेच काम करताना सुरक्षितता नियमांचे पालन करण्याचेही आवाहनही त्यांनी केले. सत्कार करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांनी पार पाडलेल्या उत्कृष्ट कामासाठी प्रोत्साहन देत त्यांच्या कामाचे अनुसरण करून जास्तीत जास्त गुणवंत कर्मचारी महावितरणच्या कर्मचाऱ्यांतून निर्माण व्हावे, अशी आशा त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व संचालन उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सुनील पिसे यांनी केले. तर सहायक मुख्य व्यवस्थापक (मा.सं.) महेश बुरंगे यांनी आभार प्रदर्शन केले. (प्रतिनिधी)