वित्तमंत्री : पैशाचा विकासासाठी उपयोग व्हावाचंद्रपूर : जिल्ह्याच्या सर्वांगिन विकासासाठी जिल्हा वार्षिक योजना २०१५-१६ साठीचा ३३१ कोटी ८६ लाखाचा जिल्हा विकास आराखडा जिल्हा नियोजन समितीने मंजूर केला. शासनाच्या प्रत्येक पैशाचा जिल्ह्याच्या विकासासाठी सदुपयोग व्हावा, असे निर्देश राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले, आमदार शोभाताई फडणवीस, मितेश भांगडिया, विजय वडेट्टीवार, नाना शामकुळे, अॅड. संजय धोटे, सुरेश धानोरकर, कीर्तीकुमार भांगडीया, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, मनपा. आयुक्त सुधीर शंभरकर व जिल्हा नियोजन अधिकारी एम.एम. सोनकुसरे उपस्थित होते. जिल्ह्यात दारूबंदी केल्यामुळे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अभिनंदनाचा ठराव समितीने मंजुर केला.मंत्रालयात पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्यासाठी प्रत्येक विभागाने एक नोडल अधिकारी नेमावा. प्रस्तावाचा पुर्ण पाठपुरावा करून काही अडचणी असल्यास आपल्याला सांगाव्या, असे ते म्हणाले. ग्र्रामपंचायत, नगरपालिका शाळांच्या परिसरात विद्युत पोल उभे करताना नाहरकत प्रमाणपत्र घ्यावे, असे निर्देश त्यांनी दिले. (नगर प्रतिनिधी)
३३१ कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी
By admin | Updated: January 28, 2015 23:11 IST