शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मनपा निवडणुकीसाठी ३.२ लाख मतदार

By admin | Updated: March 10, 2017 01:55 IST

आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी ३ लाख २ हजार ५७ मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.

संजय काकडे : १८ मार्चपर्यंत स्वीकारणार आक्षेपचंद्रपूर : आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी ३ लाख २ हजार ५७ मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यावर १८ मार्चपर्यंत आक्षेप मागविण्यात आले आहे. आक्षेपांची सुनावणी झाल्यानंतर अंतिम मतदार यादी प्रकाशित करण्यात येणार असल्याची माहिती मनपाचे आयुक्त संजय काकडे यांनी गुरूवारी दिली. तसेच निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यासाठी अंतिम मतदार यादीची आवश्यकता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मनपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आयुक्त काकडे यांनी सांगितले की, प्रारूप मतदार यादी १४ मार्च रोजी प्रकाशित केली जाणार आहे. १८ मार्चपर्यंत आक्षेप आल्यानंतर अंतिम यादी २२ मार्चला प्रकाशित केली जाणार आहे. प्रारूप मतदार यादी ‘ट्रू व्होटर’ या अ‍ॅपच्या माध्यमातून मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. त्या अ‍ॅपच्या माध्यमातूनच मतदारांना आपले आक्षेप नोंदवायचे आहेत. त्याकरिता दुसऱ्यांची मदत घेतली जाऊ शकते. तसेच मनपामध्ये मतदारांकरिता ‘मदत पथक’ तयार करण्यात आले आहे. या निवडणुकीत उमेदवारांना आपला निवडणूक खर्च ‘ट्रू व्होटर’ या अ‍ॅपच्या माध्यमातूनच सादर करायचा आहे. त्यावर कोणताही आक्षेप स्वीकारल्या जाणार नसल्याचेही काकडे यांनी स्पष्ट केले.ही मनपा निवडणूक ५ जानेवारीपर्यंत नोंदविण्यात आलेल्या यादीच्या निकषावर घेण्यात येत आहे. यावेळी मतदारांची एकूण संंख्या ३ लाख २ हजार ३५९ होती. त्यातून ३०२ मतदारांची नावे काढण्यात आली आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत ३ लाख २ हजार ५७ मतदार आपला हक्क बजावणार आहेत. गेल्या २०१२च्या निवडणुकीत २ लाख ३६ हजार ९९५ मतदार होते. त्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी ७५ हजार मतदारांची वाढ झाली आहे. निवडणुकीत मतदान वाढण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असेही त्यानी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)