शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडा मंत्री माणिकराव कोकटे यांना कुठल्याही क्षणी अटक होणार?; जिल्हा कोर्टाने सुनावला निकाल
2
IPL 2026 Auction : कॅमरुन ग्रीनसह BCCI ही मालामाल! ऑस्ट्रेलिन खेळाडूवर लागली रेकॉर्ड ब्रेकिंग बोली
3
"ज्यांनी तुम्हाला हिंदुत्व शिकवलं त्या बाळासाहेबांच्या कुटुंबाला..."; बाळा नांदगावकरांचा टोला
4
"मुंबईचे मारेकरी कोण? राजकीय स्वार्थासाठी मराठी माणसाला वापरले"; भाजपाचा ठाकरेंना टोला
5
निर्मला सीतारामन यांचं एक वक्तव्य आणि 'या' शेअर्सना लागले पंख; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
6
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
7
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
8
Chandrapur Farmer : किडनी वीक पण कर्ज फेड ! सावकाराच्या सांगण्यावरून शेतकऱ्याने ८ लाखांना विकली किडनी; कंबोडियात जाऊन केले ऑपेरेशन
9
निवडणुका जाहीर होताच उद्धवसेनेला धक्का; माजी नगरसेवकांचा जय महाराष्ट्र, शिंदे गटात प्रवेश
10
धक्कादायक! ७ वर्षांच्या मुलीचा तिसऱ्या मजल्यावरून पडून संशयास्पद मृत्यू, आईनेच खाली फेकल्याचा संशय  
11
“२०२९ मध्ये भाजपा विरुद्ध सर्व पक्ष असे चित्र दिसेल, राक्षसी महत्त्वाकांक्षा...”: रोहित पवार
12
IPL 2026 Auction : लिलावासाठी काव्या मारन नटली; सोशल मीडियावर तिच्या स्टायलिश Look ची चर्चा रंगली
13
Marriage: लग्नात आधी वधू वरमाला का घालते? त्यामागे काय आहे धार्मिक आणि सामाजिक कारण 
14
कष्टाचं फळ! आईसोबत शेतात केली मजुरी; ८ वेळा अपयश पण खचला नाही, झाला मोठा अधिकारी
15
विराट आणि अनुष्का पुन्हा एकदा पोहचले वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे घेतले आशीर्वाद
16
"अरे मर्दा, मागे तर बघ, आम्ही बिहारहून आलोय!" Vaibhav Suryavanshi याचा 'तो' व्हिडीओ व्हायरल
17
८ दिवसांत १८० टक्क्यांची तेजी; सातत्यानं 'या' शेअरला लागतंय अपर सर्किट, केडियांचीही आहे गुंतवणूक
18
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
19
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
20
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
Daily Top 2Weekly Top 5

३२ कोटींचा अर्थसंकल्प

By admin | Updated: March 22, 2016 01:01 IST

जिल्हा परिषदेच्या सोमवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत २०१६-१७ या वर्षीचा अर्थसंकल्प सादर झाला. अर्थ

चंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या सोमवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत २०१६-१७ या वर्षीचा अर्थसंकल्प सादर झाला. अर्थ समिती सभापतीने सादर केलेल्या बजेटमध्ये विविध विभागांसाठी ३२ कोटी ६४ लाख ९३ हजार रूपयाची तरतूद केली असून यात बांधकाम व कृषी विभागासाठी सर्वाधिक तरतूद करण्यात आली आहे. मात्र हा बजेट ‘खरेदी बजेट’ असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. जिल्हा परिषदेच्या सभागृहात दुपारी १ वाजता सर्वसाधारण सभेला सुरूवात झाली. अर्थ समिती सभापती ईश्वर मोहुर्ले यांनी जिल्हा परिषदेचा ३२ कोटी ६४ लाख ९३ हजाराचा वार्षीक अर्थसंकल्प तर २ लाख २० हजार ५० रूपयाचा शिल्लकी अंदाजपत्रक सादर केला. सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात सुधारीत अंदाजपत्रकानुसार जिल्हा परिषदेला विविध लेखाशिर्षाअंतर्गत प्राप्त होणारी रक्कम तसेच सुरूवातीच्या शिल्लकी रक्कमेसह ४४ कोटी ९० लाख ९४ हजार २०० रूपये महसुली उत्पन्न अपेक्षीत आहे. यामध्ये शासनाकडून प्राप्त होणारे उपकर, जिल्हा परिषदेने गुतंवेल्या रक्कमापासून मिळणारे उत्पन्न तसेच वनमहसुल अनुदानाचा समावेश आहे. २०१६-१७ या वर्षाकरिता सुरूवातीच्या शिलकेसह ३२ कोटी ६७ लाख १३ हजार ५० रूपये अपेक्षीत उत्पन्न गृहीत धरून खर्चाकरिता ३२ कोटी ६४ लाख ९३ हजार रूपयाची तरतुद करण्यात आली. यामध्ये विकास हा मुख्य उद्देश ठेवून बांधकाम विभागासाठी ९ कोटी ४८ लाख ६० हजार रूपयाची तरतूद करण्यात आली. तर कृषी विभागासाठी २ कोेटी १ लाख २ हजार, पशुसंवर्धन विभागासाठी २८ लाख ४० हजार व सिंचन व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी १ कोटी ७७ लाख रूपयाची तरतूद करण्यात आली आल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरूनुले यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अर्थ समिती सभापती ईश्वर मोहुर्ले व अन्य सभापती उपस्थि होते. (स्थानिक प्रतिनिधी)सत्ताधाऱ्यांचे ‘खरेदी बजेट’४जिल्हा परिषदेने सादर केलेला ३२ कोटी ६४ लाख ९३ हजार रूपयाचा बजेट हा खरेदी बजेट असल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी केला आहे. सभेमध्ये विविध विषयांवर विरोधी सदस्यांनी सूचना केल्या. मात्र, सत्ताधाऱ्यांनी सूचनांकडे दुर्लक्ष केले. ३० लाखांच्या वरील कामांचे तुकडे पाडून ३० लाखांच्या आत कामे करण्यासाठी ठराव घेतला. बैलबंडी घोटाळ्याची चौकशी पूर्ण झाली. अहवाल सादर झाला आहे. मात्र, अहवालाचे वाचन करण्यास सभाध्यक्षांनी नकार दिला. चौकशी समितीच्या अध्यक्षांनीही अहवाल वाचायला मिळत नसल्याचे सांगीतले. त्यामुळे हा घोटाळा सत्ताधाऱ्यांकडून दाबला जात असून आजचा बजेट ‘खरेदी बजेट’ असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.शेतकऱ्यांना थेट अनुदान४सभेमध्ये शेतकऱ्यांना पुरवठा करण्यात येणारा फायबर क्रेटचा विषय उपस्थित झाला. या योजनेत गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी येत असल्याने शेतकऱ्यांना थेट अनुदान देण्याची योजना जिल्हा परिषदेने राबवावी, अशा सूचना विरोधी सदस्यांनी केल्या. या सूचना सुधारून थेट अनुदान देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.अशी आहे विभागनिहाय तरतूदबांधकाम विभाग९,४८,६०,००० रूपये४ग्रामीण रस्ते -२ कोटी४जि.प. इमारत, अधिकारी, पदाधिकारी, कर्मचाऱ्यांचे निवास व जि.प. परिसर इमारतीचे विस्तारीकरण- ५० लाख.४बांधकाम विभागाकडे मागणी होणाऱ्या विकासकामाकरिता ४ कोटी ५० लाख ४स्मशानभूमीला जोडणारे मुरूमाचे रस्ते- ५० लाख.शिक्षण विभाग२,८६,२८,००० रूपये४शाळांकरिता फर्नीचर -२० लाख४बालक्रीडा स्पर्धा -३५ लाख४मॉडेल स्कूलअंतर्गत भौतिक व शैक्षणिक सुविधा- ३० लाख४जि.प. शाळांतील संगणक देखभाल व दुरुस्ती- १० लाख४शैक्षणिक गुणवत्ता कार्यक्रम- ५ लाख४प्राथमिक शाळांना संगणक खरेदी- ३० लाख४मिशन नवचेतना प्रकल्प- ४५ लाख४डेक्स, बेंच खरेदी- ३० लाखआरोग्य विभाग१,५९,५०,००० रूपये४प्राथमिक आरोग्य केंद्राची विज देयके- २५ लाख४रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी बसण्याची व राहण्याची सोय करण्यासाठी फर्नीचर- २५ लाख४आरोग्य केंद्रात शुद्ध जल-५० लाख४नेत्र तपासणी व चष्मे -३० लाखसमाजकल्याण विभाग३,३७,००,००० रूपये४मागासवर्गीयांच्या कल्याणकारी योजना राबविण्यासाठी जि.प. च्या उत्पन्नातून २० टक्के निधी.४मागासवर्गीय शेतकऱ्यांना पाईप पुरवठा - ४० लाख४विद्युत पंप, ताडपत्री पुरवठा- ५० लाख४काटेरी तार व आॅईल इंजिन पुरवठा- ७० लाख४मागासवर्गीय मुलींना संगणक प्रशिक्षण- १० लाख४महिलांना शिलाई, पिको फॉल मशीन पुरवठा-२० लाख४फायबर क्रेट पुरवठा- २५ लाखमहिला व बालकल्याण विभाग१,६४,६०,००० रूपये४महिला प्रतिनिधीसाठी मेळावे- १० लाख४मुलींना व महिलांना संगणक प्रशिक्षण- १० लाख४विशेष प्राविण्य मिळालेल्या मुलींचा सत्कार व उच्च शिक्षणासाठी सहाय्य- १० लाख४जेंडर प्रशिक्षण, कायदेविषयक प्रशिक्षण- १० लाख४मुलींना लेडीज सायकल पुरवठा - २० लाख४अंगणवाडीतील बालकांना गणवेश पुरवठा- १० लाखकृषी विभाग२,०१,७२,००० रूपये४शेतकऱ्यांना बायोगॅस प्लॉन्ट- १० लाख४फायबर क्रेट पुरवठा- २७ लाख४आॅईल इंजिन, वीज पंप, पेट्रोकेरोसीन इंजिन- १५ लाख४ताडपत्री व सेंद्रीय खत पुरवठा - ५० लाख४पीक संरक्षण उपकरणांचा पुरवठा -२० लाख४झिंक सल्फेट खत पुरवठा -१५ लाख४शेतीच्या संरक्षणाकरिता तार पुरवठा- २५ लाखसिंचन विभाग१,७७,००,००० रूपये४लघुपाटबंधारे तलाव देखभाल व दुरूस्ती व बांधकाम- ८५ लाख४कोल्हापुरी बंधाऱ्यांना पाट्या -७५ लाखपंचायत विभाग३,३९,२०,००० रूपये४ग्रापंचायतींना मुद्रांक शुल्क हिस्सा- २ कोटी २५ लाख४फॉगिंग मशिन केमिकल खरेदी - १५ लाख ४मॉडेल ग्रापंचायत भवन बांधकाम - ५० लाख४ग्रापंचायतींना घंटागाड्या - २० लाख४स्मशानभूमी देखभाल, दुरूस्ती, सौंदर्यीकरण - २० लाख