शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

३१ धार्मिक स्थळे अनधिकृत

By admin | Updated: February 26, 2016 00:58 IST

मुंबई उच्च न्यायालयाने २००९ नंतर बांधण्यात आलेले सर्व धार्मिक स्थळे अवैध ठरविली आहेत.

व्यवस्थापकांना बजाविली नोटीस : महानगरपालिका करणार निष्कासनाची कार्यवाहीचंद्रपूर : मुंबई उच्च न्यायालयाने २००९ नंतर बांधण्यात आलेले सर्व धार्मिक स्थळे अवैध ठरविली आहेत. अवैध धार्मिक स्थळांवर मे २०१६ पर्यंत कारवाई करावी, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार चंद्रपूर शहरात ३१ धार्मिक स्थळे ही २९ सप्टेंबर २००९ नंतरची आढळली असून ती अनधिकृत असल्याचे महानगर पालिका प्रशासनाने म्हटले आहे. याबाबत पालिकेने व्यवस्थापकांना नोटीस बजावून धार्मिक स्थळ निष्काशीत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.चंद्रपूर शहर महानगर पालिकेने अनाधिकृत धार्मिक स्थळांवर कार्यवाही करण्याचा कालबद्ध कार्यक्रम आखला आहे. त्यानुसार २९ सप्टेंबर २००९ नंतरच्या धार्मिक स्थळांवर निष्काशनाची कार्यवाही करण्यात येणार आहे. महानगर पालिकेने २४ फेब्रुवारीला काढलेल्या पत्रकानुसार चंद्रपूर शहराच्या हद्दीत ३१ धार्मिक स्थळे अवैध असल्याचे म्हटले आहे. या धार्मिक स्थळांना नोटीस बजाविण्यात आले असून ही धार्मिक स्थळे २९ सप्टेंबर २००९ पूर्वीचे असल्यास २५ फेब्रुवारीपर्यंत आयुक्तांकडे पुरावे सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.अनेक वॉर्डात रस्त्याच्या कडेला धार्मिक स्थळे उभारण्यात आली आहेत. यामुळे विकासकामांत अडथळे निर्माण होत असून वाहतुकीची समस्या उद्भवत आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने २००९ नंतर तयार करण्यात आलेले सर्व धार्मिक स्थळे हटविण्यात यावी, असे निर्देश राज्य सरकारला दिले होते. राज्य सरकारने सर्व महानगरपालिकांना आपल्या हद्दीतील अवैध धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण करण्याबाबत सुचविले होते. त्यानुसार चंद्रपूर मनपाने शहरातील अवैध धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण करून अहवाल तयार केला आहे. त्यात ३१ धार्मिक स्थळे अवैध आढळून आले. त्यामुळे व्यवस्थापकांना या धार्मिक स्थळांना हटविण्याबाबत नोटीस बजावल्या आहेत. तसेच धार्मिक स्थळे २००९ पूर्वीचे असल्याबाबतचा पुरावा २६ फेब्रुवारीला ४ वाजेपर्यंत सादर करावे व पुरावा नसल्यास ७ दिवसाच्या आत व्यवस्थापकानी स्वत: धार्मिक स्थळाचे निष्काशन करावे, अन्यथा मनपा प्रशासन कार्यवाही करून लागणारा खर्च कर वसुलीच्या रूपात व्यवस्थापकाकडून वसूल केला जाईल, असे आयुक्तांनी म्हटले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)अवैध असलेली धार्मिक स्थळेमाता मंदिर निर्माण नगर तुकूम, सत्वाचा मारोती मंदिर तुकूम, नाग मंदिर तुकूम, गणेश मंदिर पोष्ट कॉलनी तुकूम, माता मंदिर वैद्य नगर तुकूम, दुर्गा मंदिर अरविंदनगर चौक विवेकनगर, शिवनगर हनुमान मंदिर वडगाव, अमृतगंगा अपाटमेंट हनुमान मंदिर वडगाव, अमृतगंगा अपाटमेंट गणपती मंदिर वडगाव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह शिवनगर वडगाव, ताजुद्दीन बाबा नगर मंदिर मार्कंडऋषी महाकाली, महादेव लिंग तुळजाभवानी रोड तुळजाभवानी, गुरुमाऊली हनुमान मंदिर अंचलेश्वर वार्ड, माता मंदिर तुकूम, दुर्गा माता मंदिर जुमडे ले- आऊट नगिनाबाग, लुंबिनी बौद्ध विहार माता चौक मातानगर, सवारी बंगला २ नंबर क्वॉर्टर लालपेठ कॉलरी, जगदंबा मंदिर बाबुपेठ, बौद्ध विहार वैद्यनगर झोपडपट्टी तुकूम, प्रशिक बौद्ध विहार प्रज्ञा चौक नगिनाबाग, हनुमान मंदिर बगड खिडकी जवळ अंचलेश्वर वार्ड, शिवलिंग पिंड मंदिर इंजिनिअरिंग कॉलेजच्या मागे मातानगर, नागमंदिर बगड खिडकी जवळ अंचलेश्वर वार्ड, फैजाने कंजुमल इमान मश्चिद ताडबन अंचलेश्वर वार्ड, सिद्धी विनायक मंदिर ओम नगर महाकाली, हनुमान मंदिर चंद्रशेखर आझाद चौक बाबुपेठ, शितलामाता मंदिर श्रीनगर लालपेठ कॉलरी, हनुमान मंदिर लालपेठ जुनी वस्ती तुळजाभवानी, बालाजी मंदिर देवस्थान विठ्ठल मंदिर, राधाकृष्ण मंदिर व हनुमान मंदिर तुकूम, हनुमान मंदिर बाबुपेठ या धार्मिक स्थळांचा समावेश आहे.