शहरं
Join us  
Trending Stories
1
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
2
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
3
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
4
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
5
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
6
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
7
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
8
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
9
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
10
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
11
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
12
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
13
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
14
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
15
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
16
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
17
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
18
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
19
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
20
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत 300 कोटी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 05:00 IST

प्रत्येक तालुक्यात वाचनालयासाठी जिल्हा ग्रंथपालांनी सर्व प्रस्ताव एकत्रित मंजूर करून निधीची मागणी करावी. जिल्हाधिकारी गुल्हाने म्हणाले, सर्वसाधारण योजनेसाठी २४९.६० कोटी व आदिवासी उपयोजना अंतर्गत ८३.९३ कोटींचा निधी १०० टक्के खर्च झाला. एकूण मंजूर नियतव्यय ३०० कोटींचा आहे. यापैकी ३० टक्के निधी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर खर्च करायचा आहे. मंजूर नियतव्ययाच्या ६० टक्के निधीच्या खर्चाला मंजुरी दिल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाच्या संकटामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती जेमतेम असली जिल्हा विकासासाठी जादा निधी खेचून आणू. सद्यस्थितीत जिल्ह्याला एकूण मंजूर तरतुदीतून ६० टक्के निधी दिला. लवकरच १०० टक्के निधी देऊ आणि ग्रामीण रूग्णालयात फायर फायटिंग सिस्टीमही बसवू. सन २०२१-२२ मध्ये जिल्ह्यासाठी ३०० कोटी निधीच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली, अशी माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी नियोजन जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिली.यावेळी जि.प. अध्यक्ष संध्या गुरनुले, खासदार बाळू धानोरकर, आमदार ना.गो. गाणार, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मित्ताली सेठी, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे, उपायुक्त (नियोजन) थुटे, जिल्हा नियोजन अधिकारी ग. रू. वायाळ, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर आदी उपस्थित होते.पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, भंडारासारखी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी ग्रामीण रूग्णालयात ७ कोटी खर्चून फायर फायटिंग सिस्टीम लावण्यात येईल. प्राथमिक आरोग्य केंद्रांचे नुतनीकरण व काही ठिकाणी नवीन बांधकाम करावे. प्रत्येक तालुक्यात वाचनालयासाठी जिल्हा ग्रंथपालांनी सर्व प्रस्ताव एकत्रित मंजूर करून निधीची मागणी करावी. जिल्हाधिकारी गुल्हाने म्हणाले, सर्वसाधारण योजनेसाठी २४९.६० कोटी व आदिवासी उपयोजना अंतर्गत ८३.९३ कोटींचा निधी १०० टक्के खर्च झाला. एकूण मंजूर नियतव्यय ३०० कोटींचा आहे. यापैकी ३० टक्के निधी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर खर्च करायचा आहे. मंजूर नियतव्ययाच्या ६० टक्के निधीच्या खर्चाला मंजुरी दिल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हा नियोजन अधिकारी वायाळ यांनी संचालन केले. राष्ट्रगीताने बैठकीचा समारोप झाला.

बिनविरोध ग्रामपंचायतींना २५ लाखबिनविरोध निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींना विकासासाठी २५ लाखांचा निधी देण्याचे नियोजन आहे. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अशा ग्रामपंचायतींचे प्रस्ताव सादर करावे. वढा धार्मिक स्थळाला ब दर्जा देऊन निधी उपलब्ध करू. इतर मागास वर्गासाठी स्वतंत्र घरकुल योजना प्रस्तावित आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत व्हीजेएनटीच्या मुलांनाही प्रवेश देऊ, अशी माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी यावेळी दिली.

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार