शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

२९३ मुख्याध्यापक बनले सहायक शिक्षक

By admin | Updated: August 5, 2014 23:41 IST

आरटीई अ‍ॅक्टनुसार जिल्ह्यातील ५२८ मुख्याध्यापकांपैकी २३५ मुख्याध्यापकांचे समायोजन यापूर्वीच झाले. मात्र उर्वरित तब्बल २९३ मुख्याध्यापकांना पदवीधर, विशेष तसेच सहायक शिक्षण

मनस्ताप : तीन टप्प्यात झाले अपात्र समायोजनचंद्रपूर : आरटीई अ‍ॅक्टनुसार जिल्ह्यातील ५२८ मुख्याध्यापकांपैकी २३५ मुख्याध्यापकांचे समायोजन यापूर्वीच झाले. मात्र उर्वरित तब्बल २९३ मुख्याध्यापकांना पदवीधर, विशेष तसेच सहायक शिक्षण म्हणून काम करावे लागत आहे. यामुळे मुख्याध्यापकांमध्ये संतापाचे वातावरण असून अनेकांना नामुष्कीची वेळ आली आहे. काही शिक्षकांना तर ज्या शाळेत पूर्वी मुख्याध्यापक होते त्याच शाळेत सहायक म्हणून काम करावे लागत आहे.जिल्हा परिषदेंंतर्गंत मुख्याध्यापकांचे समायोजन करण्यात आले. यात प्रथम २३६ शिक्षकांचा समावेश करण्यात आला. यापैकी ८७ मुख्याध्यापकांना ते गावामध्ये कार्यरत होते. त्याच गावात ठेवण्यात आले. ८५ शिक्षकांना त्याच तालुक्यात पण दुसऱ्या गावात बदली करण्यात आली. तर, ६२ शिक्षकांचा तालुका बदल करण्यात आला. या प्रक्रियेमुळे काही शिक्षकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले असले तरी तालुका बदल झालेल्या शिक्षकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. उर्वरित २९३ मुख्याध्यापकांचे समायोजन तीन टप्प्यात करण्यात आले. या समायोजनामध्ये काही संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी वेळोवेळी शासकीय अध्यादेशाचा आधार घेतला. विशेष म्हणजे, पदवीधर शिक्षण आणि डीएड शिक्षकांचे समायोजन करताना संभ्रम निर्माण झाल्याने त्यांनी शासनाकडून माहिती मागितली. यापूर्वी ज्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून जे शिक्षक काम करत होते. अशा मुख्याध्यापकांना आता विशेष शिक्षक, पदवीधर शिक्षक, सहायक शिक्षक म्हणून काम करण्याची नामुष्की आली आहे. त्यामुळे अध्यापनाच्या कार्यात त्यांचे दुर्लक्ष होतील, असे मत शिक्षक तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.जिल्हा परिषद प्रशासनाने शिक्षकांचे समायोजन करायचे होते तर किमान जुन किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करणे अपेक्षित होते. मात्र आॅगस्ट महिना आला असतानाही समायोजनाची प्रक्रिया सुरु होती. त्यामुळे अनेक शिक्षकांचे नियोजन बिघडले आहे. काही शिक्षकांनी आपल्या पाल्यांना सोयीच्या शाळेत टाकले आहे. त्यामुळे सत्राच्या मधातच आता त्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. (नगर प्रतिनिधी)