शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

२४ तासात २८५ जण कोरोनातून मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 05:00 IST

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या १८ हजार ९७७ वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या १६ हजार ९१० झाली आहे. एक हजार ७८० बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४३ हजार ५४७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी १ लाख १९ हजार ४८६ नमुने निगेटीव्ह आले आहेत. 

ठळक मुद्दे१९९ नव्याने बाधित : दोघांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर :  मागील २४ तासात २८५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर १९९ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली आहे. दरम्यान,  दोघांचा मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या १८ हजार ९७७ वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या १६ हजार ९१० झाली आहे. एक हजार ७८० बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४३ हजार ५४७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी १ लाख १९ हजार ४८६ नमुने निगेटीव्ह आले आहेत. मृत झालेल्या बाधितामध्ये चंद्रपूर शहरातील महाकाली कॉलनी येथील २९ वर्षीय पुरूष व माता मंदिर वार्ड वरोरा येथील ७५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २८७ बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील २६७, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली ११, यवतमाळ ५, भंडारा १ आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.नागरिकांनी बाहेर निघतांना काळजी घ्यावी, मास्क लावणे, हात धुणे तसेच सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचा अवलंब करून कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या