शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

२८ लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 22:25 IST

येथील विवेकानंद वॉर्डात एका गोडावूनजवळ बल्लारपूर पोलिसांनी २८ लाख रूपये किंमतीचा सुगंधित तंबाखू जप्त केला. ही कारवाई सोमवारी सकाळी करण्यात आली. या कारवाईत चारचाकी वाहनही ताब्यात घेण्यात आले.

ठळक मुद्देबल्लारपूर पोलिसांची मोठी कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : येथील विवेकानंद वॉर्डात एका गोडावूनजवळ बल्लारपूर पोलिसांनी २८ लाख रूपये किंमतीचा सुगंधित तंबाखू जप्त केला. ही कारवाई सोमवारी सकाळी करण्यात आली. या कारवाईत चारचाकी वाहनही ताब्यात घेण्यात आले.येथील विवेकानंद वार्डातील वैशाली चौकात जयसुखलाल अंजाराम ठक्कर यांचे पान मटेरीयल विक्रीचे दुकान असून त्यालाच लागून त्याच्याच मालकीचे गोडावून आहे. सोमवारी सकाळी १० वाजता एका ट्रकमधून सुगंधित तंबाखू गोडावूनमध्ये उतरवित असल्याची माहिती बल्लारपूर पोलिसांना मिळाली. यावरून लगेचच बल्लारपूरचे पोलीस निरीक्षक नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक संदीप घोळे, पोलीस उपनिरीक्षक अचल कपूर, फरताडे, सहायक फौजदार विजय मुके, राजेंद्र खनके, चंद्रकांत जीवतोडे यांनी घटनास्थळ गाठून तंबाखू आणि ट्रक (क्रमांक एच एम ४० वाय ३९६१) जप्त केला.सोबतच गोडावूनचा मालक जयसुखलाल याला ताब्यात घेतले. जप्त केलेला तंबाखू वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळ्या डब्यात पॅक केला होता. यासंदर्भात अन्न व सुरक्षा मानके कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा तंबाखू आणला कुठून, याच्या तपासाला पोलीस लागले आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून येथील पान मटेरीयल दुकान व पानठेले, यावर सुगंधित तंबाखूची विक्री सुरू आहे. या कारवाईनंतर त्यावर काहिसा वचक बसू शकतो.