शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

२८ प्रकल्पग्रस्तांना नोकरीचे आदेश

By admin | Updated: March 11, 2017 00:42 IST

स्थानिक नागलोन खुली कोळसा खाण-२ येथे पाटाळा, नागलोन, पऴसगाव व शिवजीनगर येथील प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना नोकरी मिळण्यासाठी सुरू करण्यात आलेले ...

आंदोलन तात्पुरते स्थगित : ३० एप्रिलपर्यंत सर्वांना नोकरी माजरी : स्थानिक नागलोन खुली कोळसा खाण-२ येथे पाटाळा, नागलोन, पऴसगाव व शिवजीनगर येथील प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना नोकरी मिळण्यासाठी सुरू करण्यात आलेले खाणबंद आंदोलन दहाव्या दिवशी तात्पुरे स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर वेकोलिने २८ प्रकल्पग्रस्तांना नियुक्तीचे आदेश दिले आहेत. उर्वरित प्रकल्पग्रस्तांना ३० एप्रिलपर्यंत नोकरीमध्ये सामावून घेतले जाणार आहे.या शेतकऱ्यांनी नोकरी न मिळाल्यामुळे १० दिवसांपासून सहकुटुंब खाणीचे कामबंद आंदोलन सुरू केले होते. यावेळी वृद्ध महिलादेखील रात्रंदिवस कोळसा खाणीत ठाण मांडून होत्या. या आंदोलनामुळे वेकोलिचे १६५ हजार टन कोळसा उत्पादन ठप्प झाले होते. त्यात वेकोलिला ५० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. हे आंदोलन सुरू झाल्यानंतर वेकोलि प्रशासनाला तोडगा काढण्यात यश आले नव्हते. त्यामुळे दररोज नुकसान वाढत चालले होते. दहाव्या दिवसापर्यंत ५० कोटींचे नुकसान झाले.या बैठकीला वेकोलिचे नागपूर येथील अधिकारी घोष व परांजपे, माजरी येथील महाप्रबंधक सत्येंद्र पांडे, पोलिस उपअधिक्षक राजपूत, माजरीचे ठाणेदार कृष्ण तिवारी, प्रहार संघटनेचे गजानन कुबडे, अमोल डुकरे यांच्यासह उपविभागीय अधिकारी, भद्रावतीचे तहसीलदार, प्रकल्पग्रस्तचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. कामबंद आंदोलनात प्रकल्पग्रस्त नीलेश ढवस, संदीप झाडे, रवी उपरे, अंकुश डंभारे, गोकुल डोंगे, किसन ढवस, प्रफुल्ल भुसारी, गजानन पारशिवे, संगिता खापणे, माया ढवस, मीराबाई ढवस आदी सहकुटुंब सहभागी झाले होते. (वार्ताहर)जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकजिलाधिकारी आशुतोष सलील यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात वेकोलि अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीत वेकोलिच्या अधिकाऱ्यांनी २८ प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्याचे आदेश दिले. आणखी सात जणांना २० मार्चपर्यंत नियुक्ती दिली जाणार आहे. तसेच न्यायालयात प्रलंबित व अल्पवयस्क वगळता सर्वच प्रकल्पग्रस्तांना ३० एप्रिलपर्यंत नोकरी देण्यास मंजुरी देण्यात आली. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी ३० एप्रिलपर्यंत आंदोलन स्थगित केले आहे. वेकोलिने आपला शब्द पाळला नाही तर पुन्हा कामबंद आंदोलन करण्याचा इशारा प्रकल्पग्रस्तांच्या प्रतिनिधींनी दिला.