शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील दलित वस्त्यांसाठी २८ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 23:13 IST

नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर महानगरपालिका तसेच इतर नगरपालिका क्षेत्रातील दलित वस्त्यांमधील विकासकामांसाठी २८ कोटी ४२ लाख ४८ हजार रू. निधी मंजूर करण्यात आलेला आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचा पुढाकार : चंद्रपूर मनपा क्षेत्रासाठी ९ कोटी ६० लाख रुपये मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर महानगरपालिका तसेच इतर नगरपालिका क्षेत्रातील दलित वस्त्यांमधील विकासकामांसाठी २८ कोटी ४२ लाख ४८ हजार रू. निधी मंजूर करण्यात आलेला आहे.राज्याचे अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी पुढाकार घेतला होता, हे विशेष. चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील नागरी दलित वस्त्यांसाठी नऊ कोटी ६० लाख इतका निधी सदर योजनेअंतर्गत मंजूर झाला आहे. बल्लारपूर नगर परिषद क्षेत्रासाठी सहा कोटी २९ लाख ६४ हजार ४४२ इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. भद्रावती नगरपालिका क्षेत्रासाठी दोन कोटी ८३ लाख ४४ हजार ४०२ रू., वरोरा नगर परिषद क्षेत्रासाठी एक कोटी २५ लाख ४१ हजार ५९९ रू., ब्रम्हपूरी नगर परिषद क्षेत्रासाठी एक कोटी ८५ लाख २९ हजार २८५ रू., राजुरा नगर परिषद क्षेत्रासाठी एक कोटी चार लाख २९ हजार ५५९ रू., गडचांदूर नगर पंचायत क्षेत्रासाठी एक कोटी सात लाख ८७ हजार ६१४ रू., मूल नगर परिषद क्षेत्रासाठी एक कोटी एक लाख ७५ हजार ५३४ रू, चिमूर नगर परिषद क्षेत्रासाठी ७६ लाख ४२ हजार ५३७ रू., नागभीड नगर परिषद क्षेत्रासाठी ८३ लाख ५८४ रू., सिंदेवाही नगर पंचायत क्षेत्रासाठी ६० लाख १९ हजार १९४ रू., सावली नगर पंचायत क्षेत्रासाठी ४४७ लाख ५१ हजार ४८६ रू., गोंडपिपरी नगर पंचायत क्षेत्रासाठी २९ लाख सात हजार ९८७ रू., पोंभुर्णा नगर पंचायत क्षेत्रासाठी २४ लाख ९१ हजार ८६९ रू., जिवती न.प. क्षेत्रासाठी आठ लाख तीन हजार ४४० रू. तर कोरपना न.प. क्षेत्रासाठी १५ लाख ३१ हजार ४११ रू. निधी नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आला आहे.पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मंजूर सदर निधी जिल्ह्यातील महानगरपालिका, नगर परिषदा, नगर पंचायत क्षेत्रातील अनुसुचित जाती लोकसंख्येच्या प्रमाणात निश्चित करण्यात आलेला आहे. या निधीच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्हयातील नागरी क्षेत्रातील दलित वस्त्यांच्या विकासाचा, सुधारणांचा मार्ग सुकर झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्याने विविध योजनांतर्गत निधी मंजूर करत जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण प्रकल्प मंजूर करण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या या प्रयत्नामुळे दलित वस्त्यांचा चेहरामोहरा बदलणार आहे.