शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते व पूल विकासासाठी २७२ कोटींचा निधी

By admin | Updated: May 3, 2016 01:14 IST

रस्ते अर्थव्यवस्थेतील रक्तवाहिन्या असून रोजगार व अर्थार्जनासाठी रस्त्याचा खूप मोठा फायदा होत असतो. त्या

चंद्रपूर : रस्ते अर्थव्यवस्थेतील रक्तवाहिन्या असून रोजगार व अर्थार्जनासाठी रस्त्याचा खूप मोठा फायदा होत असतो. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील रस्ते उत्तम दर्जाचे करण्यासाठी मुबलक निधी देण्यात येणार आहे. शहराला लागून असलेल्या गावांचा विकास करण्याचा निर्धार केला असून या भागातील तरुणांना रोजगार मिळावा म्हणून भाजीपाला क्लस्टर तयार करण्यात येणार आहे. यासाठी शिवणी चोर उपसा जलसिंचन योजना व विशेष बाब म्हणून विहिरी मंजूर करण्यात येईल, असे वित्तमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.जिल्ह्यातील हडस्ती येथील वर्धा नदीवरील पुलाच्या लोकार्पणप्रसंगी रविवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आ.नाना शामकुळे, आ.संजय धोटे, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, अधीक्षक अभियंता डी.के. बालपांडे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरशे, उपविभागीय अधिकारी कल्पना नीळ, जि.प. सभापती देवराव भोंगळे, कार्यकारी अभियंता अरुण गाडेगोणे, मनोज जयस्वाल, शिवणी चोरच्या सरपंच लक्ष्मी कोहचाळे, हडस्तीचे सरपंच बंडू पारखी व कडोलीच्या सरपंच पडवेकर यावेळी उपस्थित होते.३३ कोटी ५ लाख रुपये खर्च करुन उभारण्यात आलेल्या या पुलाची लांबी ५८५ मीटर असून उंची १३ मीटर आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, सास्ती, कोलगाव, कडोली, हडस्ती, शिवणी चोर या रस्त्यावरील वर्धा नदीवर मोठया पुलासह पोच मार्गाचे बांधकाम करण्यात आले. या पुलाचे लोकार्पण रविवारी ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. सदर पूल तयार झाल्यामुळे राजुरा व गडचांदूर येथील वाहतूक नागपूर व वणीकडे जाण्याकरिता बल्लारपूर व चंद्रपूरवरुन न जाता या वळण मागार्ने जाईल.कोलगाव, कडोली, निर्ली, चार्ली, धिडसी, पेल्लोरा, पौनी, गोवरी व सातरी येथील लोकांना चंद्रपूरला जाण्यासाठी या रस्त्याचा उपयोग होणार आहे. सदर मार्गाचा चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा या शहरांना वळण मार्ग म्हणूनही उपयोग होईल. सदर वळण मार्गामुळे बल्लारपूर व चंद्रपूर शहरातील वाहतूक वर्दळ कमी होऊन प्रदूषणामध्ये घट होईल व पर्यावरण संतुलन राखता येईल.यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, चारवट गावाचे आदर्श पुनर्वसन लवकरच केले जाणार असून शिवणी चोर उपसा जलसिंचन योजना सुरु करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तीन दिवसात बैठक घेऊन निर्णय घ्यावा, असे ते म्हणाले. माना ते हडस्ती हा रस्ता खनिज विकास निधीमधून तयार करण्यात येणार असून त्यासाठी १४ कोटी ५० लाखांचे अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे. या रस्त्याचे कामही लवकरच सुरु होईल, असे ते म्हणाले. त्यासोबतच आरवटच्या पुलाचे अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार करावे, यासाठी जुलैच्या बजेटमध्ये निधी देण्यात येईल.शेतकऱ्यांचा माल बाजारपेठेत नेण्यासाठी रस्ते चांगले असणे आवश्यक असल्याचे सांगून ना. मुनगंटीवार म्हणाले, भाजीपाला क्लस्टर तयार करण्यासाठी कृषी विभाग व आत्मा यांच्या सहभागाने या भागातील ५ ते १० गावे निवडून येथील तरुणांना प्रशिक्षण देण्याची योजना तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. राजुरा-चंद्रपूरला जोडणाऱ्या रस्त्याचे शंभर कोटीचे अंदाजपत्रक तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.शिवणी वळण रस्ता सहा कोटी रकमेचे काम ना. मुनगंटीवार यांनी मंजूर केले आहे. भूसंपादनासाठी एक कोटी रक्कम अतिरिक्त मंजूर केली आहे. वरोरा तालुक्यातील वर्धा जिल्ह्याकडे जाणारा माढेळी धानोरा रस्त्यावरील नदीवरील १० कोटी रुपये किंमतीचा पूल मंजूर करण्यात आला आहे. मूल-भेजगाव रस्त्यावरील उमा नदीवरील १० कोटी किंमतीचा पूल जून २०१६ पर्यंत पूर्ण होणार आहे. मुधोली-घाटकुळ रस्त्यावरील वैनगंगा नदीवरील ७५० मीटर लांबीचा व ५० कोटी रुपये रकमेचा पूल लवकरच सुरु होत आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात उमा नदीवरील पेठगाव राजोली रस्त्यावरील १० कोटी रकमेच्या पुलाचे काम समाविष्ठ करण्यात आले आहे. अशा प्रकारे ना. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात चंद्रपूर जिल्ह्यात रस्ते व पुलाचे २७२ कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली असून यामधून २०० किलोमिटर रस्ते सुधारणा व १५ पुलाचे बांधकाम होणार असल्याचे डी.के.बालपांडे यांनी प्रास्ताविकातून सांगितले. चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात दीड वर्षात बांधकाम व रस्त्यासाठी १२०० कोटी रुपये मंजूर झाल्याचे आ. नाना शामकुळे यांनी सांगितले. या पुलामुळे शहराचे अंतर कमी होऊन त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे आमदार संजय धोटे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)