शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

२७ हजार १८१ नागरिक ‘होम क्वारंटाईन’मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 05:00 IST

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यातील नागरिक अतिशय सकारात्मक दृष्टी ठेवून लॉकडाऊन पाळत आहेत. अशावेळी शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत अन्य जिल्ह्यातील नागरिकांनी चंद्रपूरमध्ये येण्याचा प्रयत्न केल्यास गावागावांतील नागरिक प्रशासनाचे कान व डोळे झाले आहेत. जिल्हा नियंत्रण कक्षाकडे अशा पद्धतीच्या तक्रारी वाढल्या.

ठळक मुद्देखबरदारी घेण्याच्या सूचना। सीमावर्ती शेकडो गावे स्वसंरक्षणार्थ झाली सक्रिय

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना विषाणू संसर्गाचा एकही रूग्ण जिल्ह्यात आढळला नाही. मात्र नागपूर व यवतमाळ येथून येणाऱ्या नागरिकांबद्दल कसून चौकशी सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २७ हजार १८१ नागरीकांचे ‘होम क्वारंटाईन’ पूर्ण झाले असून त्यांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या. कोरोनापासून अलिप्त राहण्यासाठी प्रशासनाने केलेल्या आवाहनाला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तेलंगणा राज्याला लागून असलेल्या सीमांवर प्रशासनाकडून विशेष दक्षता घेतली जात आहे.मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यातील नागरिक अतिशय सकारात्मक दृष्टी ठेवून लॉकडाऊन पाळत आहेत. अशावेळी शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत अन्य जिल्ह्यातील नागरिकांनी चंद्रपूरमध्ये येण्याचा प्रयत्न केल्यास गावागावांतील नागरिक प्रशासनाचे कान व डोळे झाले आहेत. जिल्हा नियंत्रण कक्षाकडे अशा पद्धतीच्या तक्रारी वाढल्या. त्यामुळे जिल्ह्यात येणाºया नागरिकांनी घरातच क्वारंटाईन करून घ्यावे व आरोग्य विभागाला माहिती द्यावी, असा सूचना प्रशासनाने दिल्या.कुणी बाहेरून आल्यास माहिती द्याजिल्ह्याच्या सीमावर्ती भागामध्ये ५९५ ग्रामसेवक, २ हजार ५६३ अंगणवाडीसेविका, २ हजार ३९२ मदतनीस १ हजार ९०७ आशावर्कर १ हजार ३०० ग्राम कर्मचारी कार्यरत आहेत. यांच्या सोबतीला गावातील तरूणांनी मंडळ बनवून गावामध्ये बाहेर गावावरून येणाºया प्रत्येक नागरिकाची नोंद ठेवणे सुरू केले आहे. बाहेरून येणाºया प्रत्येक नागरिकाने तपासणी करणे गरजेचे असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.१० लाख ६७ हजारांचा दंड वसूलसंचारबंदीच्या काळात शासन व प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन न करणाऱ्यांविरूद्ध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. नियमांचे उल्लंघन करणाºया १७९ प्रकरणांत १० लाखांवर दंड वसूल, ६८७ वाहने जप्त तर ४७ नागरिकांना अटक करण्यात आली.68 नमुने निगेटिव्हशनिवारी कोरोना संशयित म्हणून ८२ नागरिकांची नोंद झाली. एकून ७४ स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी ६८ नमुने निगेटिव्ह निघाले. ६ नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे. आतापर्यंत विदेशातून, राज्याबाहेरून व जिल्हाबाहेरून २९ हजार १३ नागरिक आले. यापैकी १ हजार ८३२ नागरिक निगराणीखाली आहेत. २७ हजार १८१ नागरिकांनी १४ दिवसांचे होम क्वांरटाईन पूर्ण केले. ७२ व्यक्तींना इन्स्टिट्युशनल क्वारंन्टाईन करण्यात आले, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या