शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कत्तलीसाठी नेणाऱ्या २७ जनावरांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 22:44 IST

पोलीस स्टेशन कोठारी हद्दीतील कोठारी - कवडजई या मार्गावर हनुमान मंदिराजवळ एका ट्रकमध्ये (क्र. सीजी ०४ जेए ७६३५) २७ जनावरे भरून कत्तलीसाठी नेत असल्याची माहिती मिळताच रात्रपाळीत गस्तावर असलेल्या पोलिसांना सूचना देवून ट्रक पकडण्यात आला. पोलिसांनी सर्व जनावरांची सुटका करून ट्रक ताब्यात घेतला.

ठळक मुद्देकोठारी पोलिसांची कारवाई : ट्रकसह चालकाला अटक

लोकमत न्यूज नेटवर्कयेनबोडी : पोलीस स्टेशन कोठारी हद्दीतील कोठारी - कवडजई या मार्गावर हनुमान मंदिराजवळ एका ट्रकमध्ये (क्र. सीजी ०४ जेए ७६३५) २७ जनावरे भरून कत्तलीसाठी नेत असल्याची माहिती मिळताच रात्रपाळीत गस्तावर असलेल्या पोलिसांना सूचना देवून ट्रक पकडण्यात आला. पोलिसांनी सर्व जनावरांची सुटका करून ट्रक ताब्यात घेतला.सोमवारी सकाळी ४ वाजताच्या दरम्यान बजरंग दल कार्यकर्ता पराग गावंडे रा. वरोरा यांनी पोलीस स्टेशन कोठारी येथे फोनद्वारे माहिती दिली की कोठारी - कवडजई मार्गावर २७ जनावरे ट्रकमध्ये भरून कत्तलीसाठी घेऊन जाणारा चालक ट्रक सोडून फरार झाला. ही माहिती प्राप्त होताच स्टेशन डायरी अमलदारांनी गस्तीवर असलेल्या पोलीस हवालदार, सहकारी व पोलीस उपनिरीक्षक सोनवणे कोठारी - कवडजई मार्गाने रवाना झाले. सदर रस्त्यावर हनुमान मंदिरजवळ ट्रक उभा असलेला आढळून आला. चौकशी केली असता ट्रकमध्ये १८ गायी व नऊ बैल असे एकूण २७ जनावरे आढळून आली. त्यांची अंदाजे किंमत २ लाख १६ हजार रूपये व जनावरे भरून असलेला अशोक लेलँड कंपनीचा ट्रक किंमत १० लाख असे एकूण १२ लाख १६ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चालक गोपी आ. मडावी (४८) रा. सुमठाणा (भद्रावती) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर जनावरे सानगडी येथून ट्रकमध्ये भरली गेली व कत्तलीसाठी पोहचविली जाणार होती. पुढील तपास सुरू आहे.