शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

बेलगावात डेंग्यूचे २५ रुग्ण

By admin | Updated: August 26, 2014 23:20 IST

तालुक्यातील बेलगाव (कोलारी) येथे डेंग्यूची लागण झाली आहे. मागील आठ दिवसांपासून गावातील अनेक रुग्ण आजाराने फणफणत आहे. दरम्यान हेमलता उत्तम मेश्राम(१९) या युवतीचा

गावात भीतीचे वातावरणब्रह्मपुरी : तालुक्यातील बेलगाव (कोलारी) येथे डेंग्यूची लागण झाली आहे. मागील आठ दिवसांपासून गावातील अनेक रुग्ण आजाराने फणफणत आहे. दरम्यान हेमलता उत्तम मेश्राम(१९) या युवतीचा मृत्यू झाल्याने गावात भितीचे वातावरण आहे. आरोग्य विभागाने रुग्णांच्या रक्ताचे नमूने तपासणीसाठी पाठविले असून यातील काही रुग्ण पॉझेटिव्ह असल्याचे समजते. काही रुग्णांनी शहरातील खासगी डॉक्टरकडेही उपचार सुरु केले आहे. गावात धुरफवारणी करण्यात आली असून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात येत आहे.ब्रह्मपुरीपासून १२ कि.मी. अंतरावर असलेल्या बेलगावात घाणीचे साम्राज्य आहे. गावात मागील काही दिवसांपासून रुग्ण तापाने फणफणत आहे. काही रुग्णांची तपासणी केली असता त्यांना डेंग्यू झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. काही रुग्णांनी अऱ्हेरनवरगाव प्राथमिक रुग्णालयात उपचार सुरु केला आहे. दरम्यान गावातील हेमलता उत्तम मेश्राम(१९) या युवतीला ब्रह्मपुरी येथील खासगी रुग्णालयात उपचारसाठी नेण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी तिला नागपूर येथे हलविण्यात आले. उपचारादरम्यान नागपूर येथे तिचा मृत्यू झाला.यामुळे गावात अधिकच भितीचे वातावरण पसरले आहे.आरोग्य विभागाने गावातील २७ रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहे. यातील २ रुग्णांना डेंग्यू झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले तर याच गावातील ११ रुग्ण ब्रह्मपुरी येथील ख्रिस्तानंद रुग्णालयात उपचार घेत आहेत. यात ऋतुजा बोरकर, रिचा बोरकर, शुभांगी बोरकर या एकाच घरातील तिन सदस्यांवर उपचार सुरु आहे. पायल डोमा वासनिक, मंगेश अशोक मेश्राम, दिपा केवळ मेश्राम, सुहास अनिल बोरकर, उज्ज्वला अनिल बोरकर, राजनंदनी जयपाल बोरकर, सुनिता जयपाल बोरकर आदी ग्र्रामस्थ मागील आठ दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत आहेत. गावात प्रचंड प्रमाणात घाण साचली आहे. येथे शासनाने शौचलय बांधून दिले आहे. यातील काही शौचालय कागदोपत्री आहे. त्यामुळे नागरिक शौचास उघड्यावर जातात. तसेच नाल्यांची योग्य व्यवस्था नसल्यानेही ठिकठिकाणी पाणी जमा होत आहे. त्यामुळे गावात आजाराचे प्रमाण वाढले आहे. दररोज डेंग्यू व इतर तापांनी रुग्ण बेजार झाले आहेत. गावामध्ये किटकनाशक फवारणी केली जात असली तरी पाहिजे तशी स्वच्छता नसल्यानेच आजारांमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसापूर्वी पार पडलेल्या ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांनी आजाराविषयी ग्रामसभेत माहिती दिली. स्थानिक प्रशासनाने थातूरमातूर उपचार केला. मात्र गावात स्वच्छता मोहीम राबविली नसल्यानेच आज रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहेत. शासकीय वैद्यकीय सुविधा व गावातील भितीचे असलेले वातवरण दूर करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्षम होणे गरजेचे आहे.(प्रतिनिधी)