शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

व्यसनमुक्ती केंद्रासाठी २५ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 23:07 IST

जिल्ह्यात मागील तीन वर्षांपूर्वी दारुबंदी झाल्यामुळे काही प्रमाणात अंकुश लागला आहे. व्यसनमुक्ती संघटनेच्या माध्यमातून मला संपूर्ण चंद्रपूर जिल्हा व्यसनमुक्त करायचा आहे, असा संकल्प करीत सालेझरी व्यसनमुक्ती संघटनेच्या मागणीनुसार सालेझरी व्यसनमुक्ती केंद्रासाठी २५ लाख रुपये वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : सालेझरी व्यसनमुक्ती मेळाव्यात साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंडपिपरी : जिल्ह्यात मागील तीन वर्षांपूर्वी दारुबंदी झाल्यामुळे काही प्रमाणात अंकुश लागला आहे. व्यसनमुक्ती संघटनेच्या माध्यमातून मला संपूर्ण चंद्रपूर जिल्हा व्यसनमुक्त करायचा आहे, असा संकल्प करीत सालेझरी व्यसनमुक्ती संघटनेच्या मागणीनुसार सालेझरी व्यसनमुक्ती केंद्रासाठी २५ लाख रुपये वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले.गोंडपिपरी तालुक्यातील सालेझरी येथे प. पुज्य शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना सालेझरी यांच्या वतीने दारू व्यसनमुक्ती मेळावा नुकताच पार पडला. मेळाव्याचे उदघाटक म्हणून अर्थ नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार होते. मात्र त्यांना महत्त्वाचे काम आल्याने त्यांनी फोनद्वारे संवाद साधला.मेळाव्याचे उदघाटन जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी आमदार संजय धोटे तर प्रमुख पाहुणे म्हणून सभापती दीपक सातपुते, जि. प. सदस्य कल्पना अवतरे, पं. स. सदस्य कुसुम ढुमणे ठाणेदार प्रवीण बोरकुटे, राजाभाऊ राऊत, संजय बोरकुटे, सुनंदा रामेगीवार, नितीन ढुमने, विवेक बोनपल्लीवार, विलास मांडुरवार, उपसभापती मनीष वासमवार, संजय बुटले, संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनील डोंगरे, भाऊराव ठाकरे, लक्ष्मीकांत धानोरकर, गणपत चौधरी, पंडित काळे, बालाजी बोरकुटे, दिगांबर वासेकर, अविनाश राऊत उपस्थित होते.जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी प. पुज्य शेषराव महाराज यांच्या जीवनचरित्र्यावर प्रकाश टाकला. तर आमदार संजय धोटे यांनी राजुरा विधानसभा क्षेत्रात संघटनेच्या माध्यमातून दारू व्यसनमुक्तीवर जनजागृतीपर कार्यक्रम, महामेळावा राबविण्याचा संकल्प केला. त्यानुसार २० फेब्रुवारी रोजी मूल तालुक्यातील टेकाडी येथे मेळाव्याचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी प. पुज्य शेषराव महाराज यांचे उत्तराधिकारी प. पुज्य संतोष महाराज यांचे प्रवचन व संकल्प कार्यक्रम पार पडला. प्रास्ताविक व्यसनमुक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनील डोंगरे, संचालन रत्नाकर चौधरी यांनी केले. योवळी प. पुज्य शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना सालेझरीचे नामदेव भोयर, भालचंद्र रोहणकर, आशिष रोहणकर, लोहचंद लोहकरे, छत्रपती रोहणकर, साईनाथ बोरकुटे, बालाजी धोके, सुनील बोरकुटे आदी उपस्थित होते.