शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

२४ तासांत अपहरणकर्त्या आरोपीला अटक

By admin | Updated: September 6, 2016 00:35 IST

पाच वर्षीय बालकाचे अपहरण करुन त्याची विक्री करण्यासाठी दिल्लीला नेणाऱ्या आरोपीला पोलिसांनी आमला रेल्वे स्टेशनवर अटक केली.

बल्लारपुरातील घटना : पोलिसांची संयुक्त कारवाईबल्लारपूर : पाच वर्षीय बालकाचे अपहरण करुन त्याची विक्री करण्यासाठी दिल्लीला नेणाऱ्या आरोपीला पोलिसांनी आमला रेल्वे स्टेशनवर अटक केली. रवी केशकर असे आरोपीचे नाव आहे. आरोपी दक्षिण एक्सप्रेसने मुलाला दिल्लीला नेत होता. बल्लारपूर येथील सरदार पटेल वार्डातील रहिवासी शिवशंकर निषाद यांचा पाच वर्षीय मुलगा क्रिष्णा अंगणात खेळत होता. मात्र वेळ होऊनसुद्धा तो घरी परत न आल्यामुळे आईवडीलांनी घराशेजारी चौकशी केली. मात्र त्याचा थांगपत्ता लागला नाही. सगळीकडे शोधाशोध केल्यानंतर रात्री २.३० वाजता अपहरणाची तक्रार बल्लारपूर पोलीस स्टेशनला करण्यात आली. बल्लारपूचे ठाणेदार सिरस्कर यांनी याची माहिती त्वरीत जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवान, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रल्हाद गिरी यांना दिली. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक तयार करुन रेल्वे स्टेशन, बसस्थानक, लॉज, हॉटेल, व शहरातील प्रमुख मार्गावर चौकशी सुरु केली. त्यावेळी आरोपी रवी केशकर याने मुलाचे अपहरण केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरपीएफचे पोलीस निरीक्षक दीपक सोनटक्के, सायबर सेलचे उपनिरिक्षक मुडे व हवालदार अली यांना माहिती दिली. त्यावेळी आरोपी दक्षिण एक्सप्रेसने दिल्ली जाण्यासाठी निघाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर आरोपीला आमला स्टेशनवरुन अटक करण्यात आली. मुलाला आईवडीलांच्या स्वाधीन करण्यात आले. (शहर प्रतिनिधी)