शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

नागभीड तालुक्यात दारूविक्री प्रकरणी २०८ जणांना अटक

By admin | Updated: September 2, 2015 00:52 IST

१ एप्रिलपासून चंद्रपूर जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी करण्यात आली.

पाच महिन्यातील कारवाई : २४ लाखांची दारू जप्तनागभीड : १ एप्रिलपासून चंद्रपूर जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी करण्यात आली. दारूबंदीच्या पाच महिन्यात २४ लाख २१ हजार ५४० रुपये किंमतीची देशी-विदेशी दारू नागभीड तालुक्यात जप्त करण्यात आली असून या प्रकरणी २०८ आरोपींना अटक करण्यात आली.नागभीड तालुक्याला भंडारा जिल्ह्याची सीमा लागून आहे, तर नागपूर जिल्ह्याचीही सीमा फार लांब नाही. त्यामुळे येथे दारूच्या अवैध वाहतुकीला उधाण येईल, अशी अपेक्षा होती. त्यादृष्टीने या तालुक्यात कानपा, बाम्हणी आणि चांदी चन्नोडा या गावाजवळ पोलीस चौक्या बसविण्यात आल्या होत्या. पण या चौक्यांच्या डोळ्यात धुळ झोकूण अवैध दारूची तस्करी करण्यात आली. हे नागभीड पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांच्या संख्येवरुन व अटक केलेल्या आरोपींवरुन स्पष्ट होते.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्यात एकूण २२ केसेस करण्यात आल्या आणि २८ आरोपींना अटक करण्यात आली. या महिन्यात ३० हजार ८२५ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मे महिन्यात ५५ केसेस झाल्या आणि ५९ आरोपींना अटक करण्यात आली. चार लाख ६७ हजार ३७० रुपयाचा मुद्देमाल तर एक टाटा सुमो वाहन जप्त करण्यात आले.जून महिन्यात ३० केसेस करण्यात आल्या. चार लाख ६३ हजार ३५० रुपयाचा माल जप्त करून २५ आरोपींना अटक करण्यात आली आणि एका स्विफ्ट कारसह अन्य दोन वाहने जप्त करण्यात आली. जुलै महिन्यात ३८ केसेस झाल्या. या महिन्यात ५१ आरोपींना अटक करण्यात आली आणि सहा लाख ८० हजार ७२० रुपयाचा माल जप्त करण्यात आला. या महिन्यातील कारवाईत झायलो, ओमणी, नॅनो या वाहणांसह अन्य तीन वाहणे जप्त करण्यात आली. आॅगष्ट महिन्यात २६ आॅगस्टपर्यंत ३४ केसेस दाखल झाल्या असून ४४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर सात लाख ७९ हजार २७५ रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती नागभीड पोलिसांनी दिली आहे. (तालुका प्रतिनिधी)