शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मुख्यमंत्री पदावरून अंतर्गत कलह सुरू असतानाच सरकारचा मोठा निर्णय; २ शहरांची नावं बदलली
2
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
3
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापले रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाले- "त्याच्या हातातून..."
4
"एकदा तरी मला माझ्या बहिणीला भेटू द्या"; सोनम रघुवंशीच्या भावाची मागणी, म्हणाला... 
5
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
6
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
7
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
8
कठड्यावर धडकून बाईकखाली पाय अडकला अन...; दुचाकी पेटल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
9
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
10
आधार कार्ड दिलं नाही म्हणून काढली पँट; कावड यात्रेआधी ओळख पटवणाऱ्या लोकांवर भडकले ओवैसी
11
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
12
सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे भारतीय कर्णधार, धोनी दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
13
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
14
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
15
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
16
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
17
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
18
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
19
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
20
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)

२०२२ पर्यंत सर्वांना पक्के घरकूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 23:18 IST

देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार लोकहिताचे निर्णय घेत असून सर्वांचा विकास करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. २०२२ पर्यंत सर्वांना पक्के घरे देण्याचा सरकारचा प्रयत्न असून, प्रत्येक गावाला शुद्ध पाणी देवू, असे आश्वासन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले. ते तोहोगाव येथील समस्या निवारण सभा व कार्यकर्ता भेटीच्या कार्यक्रमात बोलत होते.

ठळक मुद्देहंसराज अहीर : तोहोगाव येथे समस्या निवारण सभा

लोकमत न्यूज नेटवर्कतोहोगाव : देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार लोकहिताचे निर्णय घेत असून सर्वांचा विकास करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. २०२२ पर्यंत सर्वांना पक्के घरे देण्याचा सरकारचा प्रयत्न असून, प्रत्येक गावाला शुद्ध पाणी देवू, असे आश्वासन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले. ते तोहोगाव येथील समस्या निवारण सभा व कार्यकर्ता भेटीच्या कार्यक्रमात बोलत होते.कार्यक्रमाला गोंडपिपरी पंचायत समितीचे सभापती दीपक सातपुते, जि.प. सदस्य वैष्णवी अमरबोडलावार, सरपंच हंसराज रागीट, उपसभापती वासमवार, महामंत्री खुशाल बोंडे, वाघुजी गेडाम, तहसीलदार सोनाली मिटकरी, संवर्ग विकास अधिकारी यशवंत मोहीतकर यांची यावेळी उपस्थिती होती.यावेळी ना. हंसराज अहीर यांनी थेट नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व संबंधीत अधिकाऱ्यांना त्या समस्या सोडवण्याचे आदेश दिले. तसा अहवालही सात दिवसात पाठवण्याचे आदेश दिले. यावेळी तोहोगाव ग्रामपंचायतीने १४४ गरजवंतांना घरे मंजूर करून बांधकाम प्रगतीपथावर असल्याने ना. अहीर यांनी सरपंच हंसराज रागीट यांचा गौरव केला. भाजप सरकार सिंचन, शेती, कौशल्य विकास, पर्यटन, रोजगार निर्माण करण्याचे काम मोठ्या प्रमाणात करीत आहेत. याचा अनेकांना लाभ होत असल्याचे यावेळी ना. अहीर यांनी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश उत्तरवार यांनी केले. तर आभार हंसराज रागीट यांनी मानले.