शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

राजुरा विधानसभा क्षेत्र विकासासाठी २० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:19 IST

निर्वाचन क्षेत्रातील मतदार संघात २० कोटींचा विशेष निधी नगरपरिषद हद्दीतील विविध विकास कामे करण्याकरिता देऊन ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती केली.

ठळक मुद्देसंजय धोटे यांची माहिती : सुधीर मुनगंटीवार यांनी केली वचनपूर्ती

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : निर्वाचन क्षेत्रातील मतदार संघात २० कोटींचा विशेष निधी नगरपरिषद हद्दीतील विविध विकास कामे करण्याकरिता देऊन ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती केली.नगर पंचायत गोंडपिपरीकरिता रस्ते, नाली, पाणी पुरवठा योजना, सार्वजनिक ठिकाणी सौंदर्यीकरणाकरिता १० कोटींची तरतूद करण्यात आली. राजुरा नगरपरिषद करिता आमदारांना २२ नोव्हेंबर ट२०१६ रोजी दिलेल्या आश्वासनाच्या अनुषंगाने रस्ते, नाली व अनेक विकास कामांसाठी चार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. गडचांदूर नगर परिषदकरिता रस्ते, नाली विविध प्रकारच्या विकास कामेकरिता दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. कोरपना नगर पंचायतकरिता रस्ते, नालीबांधकाम तसेच विविध विकास कामाकरिता दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. जिवती नगर पंचायतकरिता रस्ते, नाली बांधकाम तसेच विविध विकास कामाकरिता दोन कोटी रुपयांच्या निधीची तरतूद सन २०१७-२०१८ च्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे करण्यात आली.अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मागील वर्षी राजुरा निर्वाचन क्षेत्रातील नगर परिषद व पंचायत हद्दीतील विकास कामे करण्याकरिता १३ कोटी रुपये दिलेले होते. तसेच या वेळी सुद्धा विशेष मागणी करण्यात आली.२० कोटी रुपयांचा निधी राजुरा विधानसभेकरिता आ. अ‍ॅड. संजय धोटे यांच्या मागणीनुसार दिले आहेत. आ. धोटे यांच्या प्रयत्नातून मतदार संघाच्या विकासाला गती येत आहे. मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहे.मागील वर्षी ना. मुनगंटीवार यांनी दिलेल्या निधीतून मोठ्या प्रमाणावर शहरातील विकासाची कामे झालेली आहेत. शहरातील अनेक भागात चांगले रस्ते, नसल्याने नागरिकांंना त्रास होत होता. त्यामुळे आ. अ‍ॅड. संजय धोटे यांनी मुबई येथे पावसाळी अधिवेशनात ना. मुनगंटीवार यांची भेट घेऊन त्यांना मतदार संघासाठी निधीची मागणी केली. व त्यांनीही तत्परतेने निधी उपलब्ध करून देऊ असे सांगितले. व निधीसुद्धा दिला.