शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
3
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
4
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
5
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
6
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
7
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
8
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
9
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
10
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
11
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
12
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
13
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
14
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
15
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
16
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
17
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
18
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
19
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
20
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 

ब्रह्मपुरी क्षेत्रातील रस्ते बांधकामासाठी २० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 23:08 IST

आ. विजय वडेट्टीवार यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील विविध गावातील रस्ते बांधकामासाठी २० कोटींचा निधी शासनाकडून मंजूर झाला आहे. त्यामुळे ग्रामीण नागरिकांच्या रस्ते विषयक समस्या सुटणार आहेत.

ठळक मुद्देसमस्या सुटणार : विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांना यश

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : आ. विजय वडेट्टीवार यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील विविध गावातील रस्ते बांधकामासाठी २० कोटींचा निधी शासनाकडून मंजूर झाला आहे. त्यामुळे ग्रामीण नागरिकांच्या रस्ते विषयक समस्या सुटणार आहेत.सावली तालुक्यातील व्याहाड बुज ते वाघोली, लोंढोली ते साखरी, ब्रह्मपुरी तालुक्यातील कोसंबी ते आवळगाव रस्ते नादुरुस्त असल्याने रहदारीस अयोग्य होते. त्यामुळे या रस्त्याची पाहणी आमदार विजय वडेट्टीवार यांनी करून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत सदर रस्त्याचे नव्याने बांधकाम करण्यासाठी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग यांच्याकडे निवेदन देवून वारंवार पाठपुरावा केली. त्यांच्या परिश्रमाला यश आले असून व्याहाड बुज ते वाघोली, लोंढोली ते साखरी, कोसंबी ते आवळगाव, खरबी ते सायगाटा मरवाही नाचनभट्टी, सावली ते मेटेगाव या रस्त्याचे नव्याने बांधकाम करण्यासाठी रुपये १८ कोटी पाच लाख ११ हजार निधी तसेच पाच वर्ष देखभाल व दुरुस्ती या कामासाठी एक कोटी २५ लाख १३ हजार असे एकूण रुपये १९ कोटी ३० लाख २४ हजार निधीसह प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.आ. विजय वडेट्टीवार ब्रह्मपुरी क्षेत्रातील सर्व गावांचा जनसंपर्क अभियानांतर्गत दौरा केला. या दौºयाप्रसंगी रहदारीस अयोग्य असलेल्या रस्त्यांच्या संदर्भात व्याहाड बुज, वाघोली, लोंढोली, साखरी, कोसंबी, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, आवळगाव, खरबी, सायगाटा, गडबोरी, मेटेगाव, उमरवाही, नाचनभट्टी या गावातील नागरिकांनी आ. वडेट्टीवार यांना भेटून निवेदन दिले.त्यावेळेस आ. विजय वडेट्टीवार यांनी नागरिकांच्या उपस्थिीतच सर्व रस्त्यांची पाहणी केली होती. ब्रह्मपुरी तालुक्यातील कोसंबी ते आवळगाव रसचत्यासाठी दोन कोटी ३७ लाख २२ हजार आणि पाच वर्ष नियमित देखभाल व दुरुस्ती याकरिता १६ लाख ६९ हजार, खरबी ते सायगाटा रस्त्यासाठी दोन कोटी ६६ लाख ६७ हजार आणि देखभाल व दुरुस्ती याकरिता १८ लाख ४७ हजार तसेच सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी-उमरवाही नाचनभट्टी रस्त्यासाठी दोन कोटी ८६ लाख ८४ हजार आणि पाच वर्ष नियमित देखभाल व दुरुस्ती याकरिता रुपये १९ लाख ९१ हजार रूपयाचा निधी मंजूर झाला आहे. या कामास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे गावकºयांची रस्त्याची समस्या सुटणार आहे.