शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

नेत्र शिबिराचा १७२७ रुग्णांनी घेतला लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 22:50 IST

नेत्र विकारग्रस्त रुग्णांवर वेळीच उपचार व्हावेत, त्यांच्या दारापर्यंत नेत्रविकार तज्ज्ञ पोहचावेत, .....

ठळक मुद्देहंसराज अहीर : गावकºयांना उपचार व सेवा मिळण्याकरिता आरोग्य शिबिर आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नेत्र विकारग्रस्त रुग्णांवर वेळीच उपचार व्हावेत, त्यांच्या दारापर्यंत नेत्रविकार तज्ज्ञ पोहचावेत, त्यांच्या डोळ्यांची तपासणी करून नेमके उपचार व्हावेत, हाच या मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबिरामागचा उद्देश असून अशा शिबिराच्या माध्यमातून चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील नेत्र रुग्णांना उपचारांतून न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. नेत्र रुग्णांनी या शिबिराच्या माध्यमातून आपल्या डोळ्यांचे आरोग्य अबाधित राखावे व अधिकाधिक रुग्णांनी अशा शिबिराचा लाभ घ्यावा. भविष्यात नेत्र तपासणी शिबिराबरोबरच आरोग्य विषयक शिबिराचेही आयोजन करून डॉक्टर आपल्या दारी ही संकल्पना राबविली जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी वरोरा तालुक्यातील शेगांव (बु) या गावात आयोजित नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी केले.या शिबिरास माजी मंत्री संजय देवतळे, भाजप विधानसभा प्रमुख विजय राऊत, बाबा भागडे, नगराध्यक्ष अहतेशाम अली, भाजपा तालुकाध्यक्ष डॉ. भगवान गायकवाड, ओमप्रकाश मांडवकर, जि.प. सभापती अर्चना जीवतोडे, पं.स. सभापती रोहिनी देवतळे, नरेंद्र जीवतोडे, उपसभापती विजय आत्राम, जि.प. सदस्य ज्योती वाकडे, रमेश मानकर गुरुजी, रवींद्र कष्टी, शुभांगी निंबाळकर, राजू बच्चूवार, जि.प. सदस्य राजू गायकवाड, पं.स. सदस्या तुषार सोमलकर, पं.स. सदस्य रवींद्र धोपटे, पं.स. सदस्य पपिता गुळघाने, जि.प. सदस्य विद्या किन्नाके, पं.स. नारायण कारेकर, पं.स. वंदना दाते आदींची उपस्थिती होती. या शिबिरात २०३५ रुग्णांची नोंदणी करण्यात आली. यापैकी १७२७ रुग्णांची नेत्र चिकित्सा करुन त्यांना चष्म्याचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ७० हून अधिक नेत्र रुग्णांना शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला. या शिबिरात डॉ. प्रकाश पिल्लई, डॉ. केतन सोनी, डॉ. शमा खान, डॉ. अमित राजा, डॉ. समाधान रांगटे, डॉ. ईश्वर वंजारी, डॉ. दीपक अंबाडे, डॉ. येरमे आदींनी मोलाचे योगदान दिले.याप्रसंगी बोलताना ना. अहीर म्हणाले, ग्रामीण क्षेत्रातील रुग्णांची उपचाराच्या बाबतीत सातत्याने उपेक्षा आणि हेळसांड होत असते. जवळपास नेत्र विकाराशी संबंधित सुविधांच्या अभावामुळेही ग्रामीण क्षेत्रातील नागरिक डोळ्याच्या विकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याने उपचाराअभावी अंधत्वाचे प्रमाण कमालीचे वाढले असल्याचे चित्र ग्रामीण क्षेत्रात विशेषत्वाने दिसते. या अनुषंगाने ग्रामीण क्षेत्रामध्ये नेत्र चिकित्सा, उपचार व चष्मे वाटप शिबिराच्या आयोजनाचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगत ज्या नेत्र रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे, अशा रुग्णांवर शस्त्रक्रिया केली जाणार आहे.चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात आतापर्यंत अशा शिबिराच्या माध्यमातून हजारो नेत्र रुग्णांवर उपचार करण्यात आल्याने सामाजिक ऋणाची परतफेड केल्याचा आनंद होतो. यापुढेही अशा शिबिराच्या माध्यमातून नेत्ररुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही ना. अहीर यांनी आपल्या मनोगताद्वारे सांगितले.