शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

१७ हजार कुटुंबांना मिळाले गॅस

By admin | Updated: October 21, 2015 00:55 IST

वनालगतच्या गावात राहणाऱ्या नागरिकांचे वनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी, वृक्षतोड थांबविण्यासाठी तसेच वन्यप्राणी-मानव संघर्ष टाळण्यासाठी ...

२ हजार ५०० हेक्टरवर रोपवन लागवड : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील जखमींना १ कोटी ७९ लाखांचे अर्थसहाय्यचंद्रपूर : वनालगतच्या गावात राहणाऱ्या नागरिकांचे वनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी, वृक्षतोड थांबविण्यासाठी तसेच वन्यप्राणी-मानव संघर्ष टाळण्यासाठी वनविभागाने महत्त्वपूर्ण उपाययोजना केल्या असून वृक्षतोड कमी व्हावी यासाठी सन २०१०-११ ते २०१४-१५ या वर्षात १७ हजार ५०४ कुटूंबांना घरगुती गॅसचा पुरवठा करण्यात आला आहे. तर वन्यप्राण्यांच्या हल्यात झालेल्या नुकसानीपोटी चालू वर्षांत एप्रिल ते आॅगष्ट पर्यंत विविध ३ हजार ९७१ प्रकरणात १ कोटी ७९ लाख २० हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य वनविभागातर्फे वितरीत करण्यात आले आहे. चंद्रपूर वनवृत्तांतर्गत असलेल्या मध्य चांदा, चंद्रपूर व ब्रह्मपुरी वनविभागाच्या कार्यक्षेत्रात ४३३ संयुक्त वनव्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या सदस्यांना, ग्रामस्थांना सवलतीच्या दरात ७५ टक्के अनुदानावर गेल्या तीन-चार वर्षात शासनाच्या विविध योजनेतून आदिवासी अनुसूचित जमाती इतर प्रवर्गातील कुटुंबांना स्वयंपाक गॅसचे पुरवठा करण्यात आलेला आहे. त्यामुळे गावकऱ्यांची दैनंदिन गरजासाठी वनक्षेत्रात जाणे कमी होत असून काही प्रमाणात वनावरचा ताण कमी होण्यास सहाय्यभूत ठरलेले आहे. त्यामुळे संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे बळकटीकरण होवून गावकऱ्यांची वन व वन्य प्राण्यांबाबत आस्ता वाढलेली आहे. सन २०१०-११ ते २०१४-१५ पर्यंत एकूण १७ हजार ५०४ कुटूंबाना गॅसचा पुरवठा करण्यात आलेला आहे. तसेच सदर लाभार्थ्यांना शासन निर्णयाच्या तरतुदीनुसार पहिल्या वर्षी १२ सिलिंडर करीता ७५ टक्के अनुदानाचा सुध्दा समावेश आहे.वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने सन २०१४-१५ मध्ये ५ हजार १३१ प्रकरणात २ कोटी ६२ लाख ९९ हजार रुपये आर्थिक सहाय्य वाटप करण्यात आलेले आहे. तसेच सन २०१५-१६ मध्ये एप्रिल ते आॅगस्ट या कालावधीत आर्थिक सहाय्य वाटप करण्यात आले आहे. यात मनुष्य हानी, जखमी, पशुधन हानी, शेतपीक हानी, पशुधन जखमी अशा विविध ३ हजार ९७१ प्रकरणात १ कोटी ७९ लाख २० हजार रुपये वाटप करण्यात आले आहे. सन २०१५ तेंदू हंगामातंर्गत चंद्रपूर वनवृत्तातील एकूण ७० तेंदू घटक विक्रीकरीता ठेवण्यात आले होते. त्यापैकी ६३ तेंदू घटकाची विक्री झाली आणि ५ कोटी ९० लाख १० हजार रुपये प्राप्त झाले.रोप लागवडीद्वारे १ लाख ३५ हजार दिवस मनुष्य निर्र्मितीसन २०१४-१५ या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन व विकास परिषद, कॅम्पा व जलयुक्त शिवार योजनेतंर्गत सिमेंट बंधारे, दगडी बंधारे, वनतलाव, गॅबियन व अनघड बंधारे असे एकूण २ हजार ४९० च्या कामास ६ कोटी रुपये निधी खर्च झाला. त्यापासून २ लाख २ हजार मनुष्य दिवस निर्मिती झालेली आहे. सदर कामे पावसाळा सुरु होण्याच्या अगोदर पूर्ण झालेले असल्यामुळे वन्यप्राण्यास व वनास त्याचा फायदा होणार आहे. सन २०१५ च्या पावसाळ्यात विविध योजने अंतर्गत एकूण २४५६ हेक्टर क्षेत्रात २३ लाख ४४ हजार रोपांची लागवड करण्यात आलेली असून त्यावर ४ कोटी ३ लाख रुपये खर्च झालेला आहे. त्यापासून १ लाख ३५ हजार मनुष्य निर्मिती झाली आहे.