शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात हिंदू धर्मीय १७ लाखांवर

By admin | Updated: August 29, 2015 01:13 IST

सन २०११ मध्ये घेण्यात आलेल्या जनगणनेतील लोकसंख्येची धर्मनिहाय आकडेवारी भारताच्या रजिस्ट्रार जनरल आणि सेन्सस कमिश्नर कार्यालयाने मंगळवारी जारी केली.

धर्मनिहाय जनगणना : बौद्ध धर्मीय लोकसंख्या दुसऱ्या तर मुस्लीम धर्मीय तिसऱ्या स्थानी लोकमत विशेषचंद्रपूर : सन २०११ मध्ये घेण्यात आलेल्या जनगणनेतील लोकसंख्येची धर्मनिहाय आकडेवारी भारताच्या रजिस्ट्रार जनरल आणि सेन्सस कमिश्नर कार्यालयाने मंगळवारी जारी केली. यात चंद्रपूर जिल्ह्याची शहरी व ग्रामीण लोकसंख्या २२ लाख ४ हजार ३०७ असून यात हिंदूंचा टक्का वाढलेला आहे. जिल्ह्यात हिंदू नागरिकांची लोकसंख्या १७ लाख ८० हजार ८५ आहे. तर मुस्लीम लोकसंख्या ९२ हजार २९७ आहे. ख्रिश्चन लोकसंख्या १० हजार ७0१, शिखांची ५ हजार २५१ तर बौध्द धर्मीय लोकसंख्या २ लाख ८६ हजार ७३४, जैन समाजाची लोकसंख्या ३ हजार ८६१ व जातीधमार्चा उल्लेख न करणाऱ्या नागरिकांची संख्या २ हजार १९० व अन्य धर्मीयांची लोकसंख्या २३ हजार १८८ एवढी आहे. चंद्रपूर जिल्ह्यात २२ लाख ०४ हजार ३०७ लोकसंख्यपैकी ७ लाख ७५ हजार ३७८ लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहणारी आहे. तर १४ लाख २८ हजार ९२९ लोकसंख्या ही शहरी भागात राहणारी आहे. या लोकसंख्येत ११ लाख २३ हजार ८३४ पुरूष, १० लाख ८० हजार ४७३ महिला असून त्यातील ७ लाख २६ हजार १०६ पुरूष हे शहरी तर ७ लाख २ हजार ८२३ महिला शहरी भागात राहणाऱ्या आहते. ३ लाख ९७ हजार ७२८ पुरूष व ३ लाख ७७ हजार ६५० महिला या ग्रामीण भागात राहणारे आहे.दर दहा वर्षांनी होणाऱ्या जनगणनेचे काम सुरू असताना विविध संघटना तसेच सामाजिक संस्थांनी नागरिकांना जातीचा उल्लेख करण्याबाबत आवाहन केले होते. त्यानंतर जनगणना प्रगणकाकडे जातीचा उल्लेख करून माहिती भरण्यात आली. त्या माहितीच्या आधारे केंद्र सरकारने हा डाटा तयार केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात हिंदू लोकसंख्येसोबतच ख्रिश्चन, मुस्लीम समाजाची लोकसंख्या बऱ्याच प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. दुर्गम असलेल्या अनेक तालुक्यांमध्ये बौद्ध समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वास्तव्याला असल्याचे या धर्मनिहाय जनगणनेवरून स्पष्ट झाले आहे. धर्म न सांगणाऱ्यांची संख्या २ हजार १९० एवढी असून यांनी कोणत्याच धर्माचा उल्लेख केलेला नाही. शहरातील लोकसंख्या वाढत असून अनेक नागरिक रोजगारासाठी शहरात येऊन वास्तव्याला राहत असल्याचे मुख्य कारण आहे. यावरूनच शहरी लोकसंख्या वाढत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)