शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

खासगी मोबाईल कंपन्यांवर १७ लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 12:27 IST

चंद्रपूर शहरात महानगरपालिकेच्या परवानगीविना ठिकठिकाणी जाहिरात बॅनर लावणाऱ्या खासगी मोबाईल कंपन्यांवर महानगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे.

ठळक मुद्देमहानगरपालिकेची कारवाईविनापरवागीने बॅनर लावणे पडले महागात

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : चंद्रपूर शहरात महानगरपालिकेच्या परवानगीविना ठिकठिकाणी जाहिरात बॅनर लावणाऱ्या खासगी मोबाईल कंपन्यांवर महानगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. या मोबाईल कंपन्यांकडून १७ लाख ४२ हजार रुपयांचा दंड वसूल करून आयडिया मोबाईल कंपनीला दंडासहीत ३२ लाख ८२ हजार १९७ रुपयांचे टॅक्स भरण्याचा नोटीस बजावण्यात आला आहे.प्रत्येकाला मोबाईल हे जीवनावश्यक झाले आहे. त्यामुळे विविध मोबाईल कंपन्यांकडून ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी ठिकठिकाणी मोठमोठे बॅनल लावले जात आहेत. मात्र यासाठी स्थानिक प्रशासनाची कोणतीही परवानगी घेतली जात नाही. यातून स्थानिक प्रशासनाचे महसूल बुडत असल्याची बाब समोर आल्याने महानगरपालिकेने खासगी मोबाईल कंपन्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.मनपाच्या कर वसुली विभागाने चंद्रपूर शहरातील सर्व प्रभागात सर्व्हेक्षण करून अनाधिकृत बॅनर लावणाऱ्या खासगी कंपन्यांना एक टक्का दंडासह टॅक्स भरण्याचे नोटीस बजावले होते. चंद्रपूर शहरात ओपो मोबाईल कंपनीचे चार बॅनर लावण्यात आले होते. या कंपनीवर ५ लाख २१ हजार १३० रुपये, विवो कंपनीच्या २३ बॅनरसाठी ९ लाख ८० हजार ७१ रुपये, सॅमसंग मोबाईल कंपनीचे डिस्ट्रीब्युटर गोपाल सेल्स यांच्या १० बॅनर साठी २ लाख १२ हजार ३५८ रुपये वसूल करण्यात आले आहे.आयडिया मोबाईल कंपनीने शहरातील नविन व जुन्या वस्तीमध्ये सर्वाधिक ७९ जाहिरात बॅनर लावले होते. याप्रकरणी महानगरपालिकेने या कंपनीवर ३२ लाख ८२ हजार १९७ रुपये टॅक्स भरण्याच्या नोटीस पाठविण्यात आले आहे. सदर टॅक्स न भरल्यास कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे कर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.गतवर्षी ८६ बॅनरला दिली होती परवानगीशहरात दरवर्षीच वर्दळीच्या भागात विविध कंपन्यांचे बॅनर दिसून येतात. यासाठी महानगरपालिकेकडून रितसर परवानगी घ्यावी लागते. टॅक्स भरल्यानंतर महानगरपालिका बॅनर लावण्याची परवानगी देत असते. गतवर्षी १५ लाख ५६ हजार १४९ रुपये टॅक्स आकारून ८६ ठिकाणी बॅनर लावण्याची मंजुरी महानगरपालिकेने दिली होती. मात्र यापैकी गतवर्षीचे ८ लाख २२ हजार ८१७ रुपये वसुल होणे बाकी आहे. चालू वर्षात ४ लाख ८२ हजार ३४७ रुपये करवसुली करण्यात आली आहे.

टॅग्स :Mobileमोबाइल