शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या ‘से नो टू क्राईम’ ला १६९ महाविद्यालयांकडून हमी

By admin | Updated: August 10, 2016 00:35 IST

जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी सोमवारी जिल्ह्यातील १६९ कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांत जनजागृती करण्यासाठी...

चंद्रपूर : जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी सोमवारी जिल्ह्यातील १६९ कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांत जनजागृती करण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या ‘से नो टू क्राईम’ कार्यक्रम राबविला. यादरम्यान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून ‘से नो, टू क्राईम’ची विद्यार्थ्यांकडून हमी घेतली. पोलीस प्रशासनातर्फे विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्याच्या दृष्टीने एकाच वेळी मार्गदर्शन पर अभियान राबविण्यात आले. ज्यामध्ये ‘से नो टू महिला अत्याचार, से नो टू बाल शोषण, से नो टू वाहतुकीचे उल्लंघन, से नो टू गुंडागर्दी, सो नो टू ड्रग्स, से नो टू आतंकवाद अशा प्रकारच्या घोषवाक्याने संपूर्ण महाविद्यालय परिसर दणाणले. कार्यक्रमाची सुरुवात पोलीस मुख्यालयात पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या संकल्पनेतील ‘से नो’ या अभियानाबाबत प्रोत्साहनपर मार्गदर्शन सभेद्वारे झाली. यामध्ये पोलीस अधीक्षकांनी अभियानाचा हेतू व्यक्त केला. सकाळी ९ वाजता पोलीस मुख्यालय येथून काढण्यात आलेल्या पायदळ मार्चला हिरवी झेंडी दाखवून चळवळीचा शुभारंभ केला. या रॅलीमध्ये पोलीस प्रशासनासोबत शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी व पोलीस मित्र, शांतता कमेटीचे सदस्य, स्वयंसेवक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जिल्ह्यातील चार महाविद्यालय स्वत:च्या वाट्याला घेत पोलीस अधीक्षकांनी स्वत: मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थ्यांना निडरपणे पुढे येऊन होणाऱ्या अत्याचाराबाबत माहिती पोलिसांना देण्याबाबत आवाहन केले.यावेळी प्रत्येक महाविद्यालय स्तरावर एक समिती गठीत करण्यात आली. ज्यामध्ये एक पोलीस अधिकारी, एक प्राध्यापक प्रतिनिधी, पाच विद्यार्थी प्रतिनिधी एक सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते त्याचप्रमाणे पालक वर्गातील दोन प्रतिनिधी यांचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक महाविद्यालयात तक्रारपेटी लावण्यास प्राध्यापकांना प्रोत्साहित करण्यात आले असून या तक्रारींची वेळोवेळी संबंधीत महाविद्यालयाचे प्राचार्य व गठीत समितीद्वारे पाहणी करुन त्याचे निराकरण करण्यात येईल.यावेळी पोलीस अधीक्षकांसह अपर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत, उपपोलीस अधीक्षक जयचंद्र काटे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रल्हाद गिरी यांच्यासह शहरातील पोलीस ठाण्याचे ठाणेदार, जिल्हा शांतता समितीचे सदस्य विविध संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.