शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

वन प्रबोधिनीतील तीन इमारतींच्या नूतनीकरणासाठी १६ कोटींचा निधी मंजूर

By admin | Updated: March 3, 2016 01:14 IST

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून साकारत असलेल्या चंद्रपूर येथील वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनीच्या वसतिगृह इमारतीचे नूतनीकरण,

पालकमंत्र्यांचा पुढाकार : राज्य शासनाकडून प्रशासकीय मान्यताचंद्रपूर : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून साकारत असलेल्या चंद्रपूर येथील वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनीच्या वसतिगृह इमारतीचे नूतनीकरण, प्रेक्षकगृह इमारतीचे नूतनीकरण, संचालक निवासस्थान इमारतीचे बांधकाम आणि प्रशासकीय इमारतीच्या नूतनीकरणासाठी १६ कोटी रूपये किमतीच्या अंदाजपत्रकांना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.सुधीर मुनगंटीवार यांनी वनमंत्री पदाची धुरा सांभाळताच चंद्रपूर येथे वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या प्रबोधिनीच्या प्रशासकीय इमारतीचे नूतनीकरण करण्यासाठी ४.८० कोटी, प्रेक्षकगृह इमारतीच्या नूतनीकरणासाठी ४.३३ कोटी, संचालकांच्या निवासस्थान बांधकामासाठी १.८५ कोटी, वसतिगृह इमारतीच्या नूतनीकरणासाठी ४.८४ कोटी किमतीच्या अंदाजपत्रकाला महसूल व वन विभागाने १ मार्चच्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.प्रशिक्षणार्थ्यांना सर्व सोयी सुविधांनी युक्त उच्चतम व आरामदायी निवास व्यवस्था व आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे प्रशिक्षण देऊन वन विभागासाठी सक्षम मनुष्यबळ निर्माण करण्याच्या दृष्टीने या वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनीच्या माध्यमातून कार्य करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये अस्तित्वात असलेल्या इमारतींचे नुतनीकरण, आधुनिकीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करण्यात आला असून दुसऱ्या टप्प्यामध्ये वन अकादमीचा संकल्पित आराखडा, प्रकल्प व्यवस्थापन समिती गठित करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. (स्थानिक प्रतिनिधी)