शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

१५ व १६ ला धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 23:07 IST

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ६१ वर्षापूर्वी इतिहासात सोनेरी पान लिहिले. समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधुत्वाचा संदेश देणारा बौद्ध धम्म स्वीकारला. या घटनेला उजाळा म्हणून लाखो बौद्ध बांधव दरवर्षी दीक्षाभूमीवर समतेचा जागर करतात. ही आठवण सतत व्हावी म्हणून येथील दीक्षाभूमीवर १५ व १६ आॅक्टोबर रोजी ६२ वा धम्मचक्र अनुवर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यासाठी देश-विदेशातील भंतेची उपस्थिती राहणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ६१ वर्षापूर्वी इतिहासात सोनेरी पान लिहिले. समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधुत्वाचा संदेश देणारा बौद्ध धम्म स्वीकारला. या घटनेला उजाळा म्हणून लाखो बौद्ध बांधव दरवर्षी दीक्षाभूमीवर समतेचा जागर करतात. ही आठवण सतत व्हावी म्हणून येथील दीक्षाभूमीवर १५ व १६ आॅक्टोबर रोजी ६२ वा धम्मचक्र अनुवर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यासाठी देश-विदेशातील भंतेची उपस्थिती राहणार आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीच्या वतीने आयोजित धम्मचक्र अनुवर्तन सोहळ्याला १५ आॅक्टोबरला सायंकाळी ४ वाजता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून शांती मिरवणुकीने प्रारंभ होणार आहे. यावेळी भदंत आर्य नागार्जून सुरई ससाई, महाथेरो भदंत ज्ञानज्योती महास्थवीर उपस्थित राहतील. त्यानंतर सायंकाळी ४.३० वाजता धम्मध्वजारोहण होईल. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुण घोटेकर असतील. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी कुणाल खेमणार, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी उपस्थित राहतील.१६ आॅक्टोबरला सकाळी १० वाजता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थिकलशासह लक्षवेधक मिरवणूक दीक्षाभूमीपर्यंत काढण्यात येणार आहे. मुख्य समारंभ सायंकाळी ५ वाजता होईल. प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, केंद्रीय राज्यमंत्री किरेन रिजीजू, ना. रामदास आठवले, ना. राजकुमार बडोले, आ. नाना श्यामकुळे, जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर उपस्थित राहतील.