शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

१५ वर्षांपासून शशीकलाचा घरकुलासाठी संघर्ष

By admin | Updated: July 30, 2016 01:36 IST

बल्लारपूर पंचायत समिती अंतर्गत कोठारी ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणाऱ्या शशीकला कन्हैयालाल गोस्वामी ...

अधिकाऱ्यांची उदासीनता : विधवा महिलेला सोसाव्या लागताहेत यातना कोठारी : बल्लारपूर पंचायत समिती अंतर्गत कोठारी ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणाऱ्या शशीकला कन्हैयालाल गोस्वामी ही महिला मागील पंधरा वर्षापासून घरकुलासाठी शासनाच्या दरबारी उंबरठे झिजवीत आहे. मात्र तिला अजूनही घरकुलाचा लाभ देण्यात आला नाही. घरकुलाच्या लाभासाठी तिचा संघर्ष आजही सुरुच आहे. कोठारी येथे २००२-०३ या वर्षी दारिद्र्य रेषेखालील यादी जाहीर करण्यात आली. त्यात ४४४ नागरिकांचा समावेश करण्यात आला. या यादीत कन्हैयालाल भैरुलाल गोस्वामी यांचे नाव असून त्यांचा कुटंब ओळख क्र. ४५९३ आहे व त्यांचे १९ गुण आहेत. या यादीत चौकशी व तपासणीअंती ० ते २१ गुण असणाऱ्यांची नावे समाविष्ट आहेत. बीपीएल यादीत समाविष्ट असणाऱ्यांच्या घराची मोका चौकशी पंचायत समितीकडून करण्यात आली. त्यांच्याच अभियंत्यामार्फत कच्च्या घराची प्रतीक्षा यादी तयार करुन त्यात ८० लाभार्थ्यांना घराची आवश्यकता असल्याचा अहवाल संवर्ग विकास अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला. त्यातही शशिकला गोस्वामी यांचे पती कन्हैयालाल गोस्वामी यांचे नाव समाविष्ट करण्यात आले. मात्र त्यांच्याकडे घरे बांधण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याचा शेरा चौकशी करणाऱ्या अभियंत्यानी मारला. परिणामी शशिकला गोस्वामी यांचे नाव घरकुल लाभार्थी मंजूर यादीत नाही. परंतु प्रत्यक्षात ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डवर घराची (झोपडीची) नोंद असून त्यांच्याकडून ग्रामपंचायत प्रशासन घर आकारणी कर दरवर्षी वसूल करीत आहे. मग प्रत्यक्ष मोका चौकशी करणाऱ्या अभियंत्यांना या महिलेचे घर दिसले नाही का? याचाच अर्थ अभियंत्यांनी घरबसल्या कुणाच्या सांगण्यावरुन यादी प्रसारित करुन शशीकला गोस्वामी या विधवेस घरकुल लाभांपासून वंचित केले. असा प्रकार गावातील पाचही वॉर्डात आहे, हे विशेष. जनता शाळेच्या मागे विधवा शशिकला कन्हैयालाय गोस्वामी ही महिला मागील २० वर्षापासून चंद्रमौेळी झोपडीत दोन मुलांना घेवून वास्तव्य करीत आहे. तिच्या झोपडीची दशा पाहून त्यात जनावरांनाही ठेवण्यालायक व्यवस्था नाही. सर्वत्र दुर्गंधी, गटराचे पाणी वाहते. मच्छरांचा प्रादुर्भाव, सरपटणाऱ्या विषारी प्राण्यांचा हैदोस अशा ठिकाणी ती दोन लहानग्या मुलांना घेवून जीवन जगत आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी धुनी, भांडी व मोलकरणीचे काम करणाऱ्या या महिलेचा संघर्ष हृदयद्रावक आहे. मात्र पाषाण हृदयी लोकप्रतिनिधींचे व कल्याणकारी अधिकाऱ्यांचे याकडे लक्ष जाऊ नये, यातच त्यांच्या कर्तव्यदक्षतेचा परिचय येतो. ग्रामपंचायतीच्या कार्यालयात घरकुलासाठी अर्ज, विनंत्या करून टाहो फोडला. मात्र तिच्या मागणीकडे कुणीही लक्ष दिले नाही. अखेर निराश होवून आपल्याच नशिबाला दोष देत तिला जीवन कंठावे लागत आहे. जनतेच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन देत प्रतिनिधीत्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींनाही तिच्या संघर्षाविषयी देणेघेणे नसल्याचे दिसून येते. शासकीय योजनांचा लाभ गरजूंना मिळाला पाहिजे. जर तो शासकीय अधिकाऱ्यांकडून योग्यरित्या मिळत नसेल तर अशावेळी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन अधिकाऱ्यांच्या नजरेत ती बाब आणून देणे गरजेचे आहे. मात्र संबंधित महिला आपली कुणीही नाही म्हणून त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे, हे कितपत योग्य आहे. शशिकला गोस्वामी या महिलेने आजपर्यंत चार सरपंचांचा कार्यकाळ पाहिला. मात्र त्यातील एकालाही तिची दैनावस्था दिसली नाही. हीच त्यांची जनतेप्रति भावना व कर्तव्यदक्षता काय, असा प्रश्नही यानिमित्त उपस्थित केला जात आहे. शशिकलांच्या घरकुलाबाबत लोकमतने ग्रामपंचायतीकडे विचारणा केली. मात्र ती चूक आमची नाही. शासकीय स्तरावरुन ती चुक झाली असल्याचे सांगण्यात आले. ग्रा.पं. सदस्य तथा बल्लारपूर तालुका युवा काँग्रेस अध्यक्ष विनोद बुटले यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन शशिकला गोस्वामीला घरकुलासाठी शासनदरबारी पत्रव्यवहार करुन न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आतातरी शशिकलाला घरकुलाचा लाभ मिळून नरक यातना संपणार काय, हा प्रश्न अनुत्तरित आहे. (वार्ताहर)