शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

एटीएम अपडेटच्या नावाखाली तरुणाला १५ हजारांचा फटका

By admin | Updated: February 19, 2017 00:33 IST

एटीएम कॉर्ड अपडेट करण्यासाठी बँकेत गेलेल्या तरुणाला पंधरा हजारांचा चुना लागला.

बँक अधिकाऱ्यांचे हात वर : पोलिसांनी दाखविली बाहेरची वाट वरोरा : एटीएम कॉर्ड अपडेट करण्यासाठी बँकेत गेलेल्या तरुणाला पंधरा हजारांचा चुना लागला. चमत्कारिकरीत्या बँक खात्यातून १५ हजार रुपये वजा झाल्यानंतर चौकशीसाठी गेलेल्या तरुणाला बँक अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन त्याची बोळवण केली तर वरोरा पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यानंतर तेथून तरुणाला बाहेरची वाट दाखविण्यात आली. ही घटना रविवार ला वरोरा येथे घडली. महेश पुरुषोत्तम पाटील रा . वरोरा असे या तरुणाचे नाव आहे .८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाचशे व हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या आणि कॅशलेस व्यवहार सुरु करण्यात आला. यासाठी अनेकांचे एटीएम कार्ड ब्लॉक करून नवीन एटीएम कार्ड पोस्टाने घरपोच पाठविण्यात आले. कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी पेटीएम, एम पैसा आदी अ‍ॅप्सचा वापर मोठ्या प्रमाणात युवक वर्ग करताना दिसून येत आहे. आॅनलाईन व्यवहाराने अनेक कामे जलदगतीने होत जरी असली तरी या आॅनलाईन व्यवहाराने अनेकांना मोठा चुना लागत असल्याच्या घटनेतही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अशाच एका घटनेने वरोरा शहरातील एका युवकाला पंधरा हजाराने गंडविण्यात आल्याची घटना नुकतीच घडली . वरोरा शहरातील महेश पुरुषोत्तम पाटील या तरुणाचे स्टेट बँक आॅफ इंडिया वरोरा या बँकेत बचत खाते आहे. काही दिवसांपूर्वी महेशचे एटीएम कार्ड ब्लॉक करण्यात आले आणि नवीन ए टी एम कार्ड पोस्टाने घरी आले. सदर एटीएमचा पिन नंबर घेण्यासाठी महेश स्टेट बँक आॅफ इंडिया वरोरा येथे गेला असता त्याला तेथील कर्मचाऱ्यांनी प्रथम बँक खात्याला मोबाईल नंबर जोडण्यासाठी सांगितले. त्या नंतर महेशने बँकेला मोबाईल नंबर जोडण्यासाठी अर्ज दिला. काही वेळाने मोबाईल नंबर बँक खात्याशी अपडेट झाल्यानंतर मोबाईल नंबरवर एक मॅसेज आला. त्यात एक लिंक आली. ही लिंक कदाचित एटीएम पिन नंबरची असावी, असा समज त्या तरुणाला झाला आणि त्याने त्या लिंकवर क्लिक केले असता त्याला डाउनलोड असा पर्याय आला. त्याला क्लीक केल्यानंतर तिथे ग्राहक सेवा मदत क्रमांक ८८७३६६८६३९ लिहिला असल्याने त्या तरुणाने त्या नंबरवर फोन केला असता त्याला एटीएम कार्डचा समोरील १४ अक्षरी नंबर विचारण्यात आला काही वेळाने एटीएम मागील ४ अक्षरे विचारण्यात आली. त्यानंतर मोबाईल वर आलेला ओटीपी नंबर सांगितला. प्रथम पाच हजार रुपये खात्यातून वजा झाले, असे तीनदा पाच पाच हजार रुपये म्हणजेच १५ हजार रुपये खात्यातून वजा झाले. या तरुणाने कोणताही विचार न करता बिनधास्तपणे माहिती सांगितली. त्यानंतर त्या युवकांनी आपल्या खात्यातून पैसे वजा होत असल्याचे त्यांना सांगितले. मात्र समोरून एटीएम अपडेट होत असल्याचे सांगण्यात येत होते. काही वेळानंतर पेटीएम, एम पैसा च्या माध्यमातून पैसे काढल्या जात असल्याचे या तरुणाच्या लक्ष्यात आले व आपली फसगत होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी फोन कापला आणि स्टेट बँक आॅफ इंडिया वरोरा येथे जाऊन माहिती दिली. मात्र बँक अधिकाऱ्यांनी या तरुणाची दखल घेण्याऐवजी उलट त्या तरुणाला दम देत उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे हताश झालेल्या महेशने थेट वरोरा पोलीस ठाणे गाठले व तिथे असलेल्या दोन अधिकाऱ्यांना तक्रार केली. मात्र त्या अधिकाऱ्यांनी तक्रार घेण्याऐवजी त्या तरुणाला सांगण्यात आले की तुझे खाते अपडेट करणे चालू आहे, पैसे परत खात्यात जमा होईल, असे सांगेन त्या तरुणाला बाहेरची वाट दाखविण्यात आली. त्या तरुणाला पंधरा हजाराचा चुना लावनाऱ्यांचे बँक व पोलीस खात्याशी कोणती लिंक आहे, हे मात्र कळेनासे झाले आहे .(शहर प्रतिनिधी )