शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

१५ हजार कर्मचारी सुविधांपासून वंचित

By admin | Updated: May 14, 2014 01:34 IST

शासकीय सेवेत कंत्राटी पद्धतीने काम करणारे जिल्ह्यातील पंधराहजारावर कर्मचारी सोयी-सुविधांपासून वंचित आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनाही सोयी उपलब्ध करून द्याव्या,

चंद्रपूर : शासकीय सेवेत कंत्राटी पद्धतीने काम करणारे जिल्ह्यातील पंधराहजारावर कर्मचारी सोयी-सुविधांपासून वंचित आहे. त्यामुळे या कर्मचार्‍यांनाही सोयी उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, कंत्राट स्वरुपात नोकरी असल्याने त्यांच्या संघटनाही नाही.

राज्य शासनाने शहरी व ग्रामीण भागातील कामे जलदगतीने व्हावी यासाठी विविध योजना सुरू केल्या. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना, भारत निर्माण कार्यक्रम, संपूर्ण स्वच्छता अभियान, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान, पाणलोट विकास कार्यक्रम, मागास क्षेत्रविकास कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, महिला व बालकल्याण विभाग, जलस्वराज्य प्रकल्पाचा समावेश आहे. या योजनात कंत्राटी पद्धतीनेच कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आजच्या घडीला जिल्ह्यात जवळपास १५ हजार कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहे. या सर्व कर्मचार्‍यांना १0 ते १५ हजार आणि ३५ ते ४0 हजारापर्यंंंत वेतन दिले जाते.

शासकीय कर्मचार्‍यांना शासनाचे विविध लाभ मिळतात. मात्र, कंत्राटी कर्मचार्‍यांना कोणत्याच योजनांचा लाभ मिळत नाही. इतकेच नव्हे तर भविष्यनिर्वाह निधीचीही कपात करण्यात येत नसल्याची धक्कादायक माहिती आहे. याच कारणांमुळे कंत्राटी कर्मचार्‍यांना शासनाच्या विविध सोईसुविधांपासून मुकावे लागत आहे. उद्योगात काम करणार्‍या कामगारांचे ‘पीएफ’ कपात करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. मात्र, अशी सक्ती कंत्राटी कर्मचार्‍यांबाबत लागू नसल्याची खंत कर्मचारी व्यक्त करीत आहेत. (नगर प्रतिनिधी)