लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पडोली पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी नाकाबंदी करुन ७० पेट्या दारु व चारचाकी वाहन, असा एकूण १५ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी एकला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवारी पहाटेच्या सुमारा करण्यात आली.गुरुवारी पहाटेदरम्यान पडोली पोलीस पेट्रोलिंग करीत असताना राळेगाव, वणी येथून एका चारचाकी वाहनातून दारुची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली, या माहितीच्या आधारावर ठाणेदार व्ही. एम. ढाले यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून पडोली-घुग्घुस हायवेवर नाकाबंदी करण्यात आली. यावेळी महिंद्रा एक्सयुवी वाहनाची तपासणी केली असता वाहनात ७० पेट्या सात हजार बॉटल्स आढळून आल्या. पोलिसांनी सर्व दारुसाठा व चारचाकी वाहन असा एकूण १५ लाख एक हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार वैशाली ढाले, पोलीस उपनिरीक्षक जायले यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.
१५ लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 22:58 IST
पडोली पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी नाकाबंदी करुन ७० पेट्या दारु व चारचाकी वाहन, असा एकूण १५ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी एकला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवारी पहाटेच्या सुमारा करण्यात आली.
१५ लाखांचा मुद्देमाल जप्त
ठळक मुद्देपडोली पोलिसांची कारवाई : एकाला अटक