शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेला १५ दिवसांचा अल्टीमेटम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2016 00:20 IST

मुख्य रस्त्यांसह जोडरस्त्यांवर मोकाट जनावरे उभे राहत असल्याने रहदारीला अडथळा होत असून अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही.

अध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा : प्रकरण शहरातील मोकाट जनावरांचेभंडारा : मुख्य रस्त्यांसह जोडरस्त्यांवर मोकाट जनावरे उभे राहत असल्याने रहदारीला अडथळा होत असून अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आज नगरपालिकेत जाऊन अध्यक्ष बाबूराव बागडे व मुख्याधिकारी अनिल अढागळे यांची भेट घेतली. तसेच येत्या १५ दिवसात शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न मार्गी लावावा यावर गंभीरतेने चर्चा केली. यात उभयंतांनी १५ दिवसात हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. जवळपास दीड लक्ष लोकसंख्या असलेल्या भंडारा शहरात लहान सहान समस्या आ वासून उभ्या आहेत. त्यापैकी मोकाट जनावरांची समस्या उग्र रुप धारण करीत आहे. दूषित पाणीपुरवठा, अतिक्रमणाने गजबजलेले रस्ते, रस्त्यावरील जीवघेणे खड्डे या मुख्य समस्या आधीच नागरिकांच्या संयमाचा अंत पाहत आहेत. यावर लहान सहान समस्येवर रामबाण उपाय शोधून काढावा यासाठी शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी दखल घेतली. या उद्देशाने आज पालिकेत दुपारी १ वाजताच्या सुमारास नगरपालिकेचे अध्यक्ष बाबूराव बागडे तथा मुख्याधिकारी अनिल अढागळे यांची भेट घेत गंभीर विषयांवर चर्चा करण्यात आली. या चर्चेत डॉ.नितीन तुरस्कर, आशू गोंडाणे, नितीन दुरगकर, नितीन साकुरे, मनोज बोरकर, भूपेश तलमले, शमीम शेख यांच्यासह अन्य जणांनी सहभाग नोंदविला. मोकाट जनावरांच्या प्रश्नावर मुख्याधिकाऱ्यांनी येत्या १५ दिवसात कांजी हाऊसचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्यासह शहरातील ज्या रस्त्यांची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे असे रस्ते कायमस्वरुपी सिमेंटीकरण करण्याचे प्रस्तावित असल्याचेही याप्रसंगी सांगण्यात आले. येणाऱ्या दिवसात पालिका प्रशासन यावर खरच गांभीर्यता दाखविते काय? याकडे आता सर्वांची नजर आहे. (प्रतिनिधी)