शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.च्या १३६ कर्मचाऱ्यांचे ‘लेखणी बंद’ आंदोलन

By admin | Updated: March 16, 2017 00:35 IST

सध्या मार्च एन्डिंगची लगबग सुरू असतानाच विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हा परिषद लेखा कर्मचारी ...

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे आंदोलन : पंचायत समिती, जिल्हा परिषदेची कामे प्रभावितचंद्रपूर : सध्या मार्च एन्डिंगची लगबग सुरू असतानाच विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेच्या पंचायत समिती व जिल्हा परिषदेत कार्यरत १३६ कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून लेखणी बंद आंदोलनाला सुरूवात केली आहे. त्यामुळे प्रशासकीय कामांना ब्रेक लागला असून कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे अनेक कामांचा खोळंबा होणार आहे. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा संवर्गातील कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत भेदभाव पूर्ण वागणूक मिळत असल्यामुळे लेखा कर्मचारी संघटनेने १० प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी २७ जानेवारीला आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता. मात्र मागण्यांची पुर्तता झाली नाही. त्यामुळे १० मार्चपासून सर्व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केले. मात्र त्यानंतरही दखल घेण्यात न आल्याने लेखा कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून काम बंद आंदोलनाला सुरूवात केली आहे. पंचायत समिती व जिल्हा परिषदेत कार्यरत लेखा कर्मचाऱ्यांच्या लेखणी बंद आंदोलनामुळे वित्त विभागाच्या अनेक कामांना ब्रेक लागला आहे. मार्च एडींगमुळे प्रलंबित कामे निकाली काढण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू आहे. तसेच जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्पही याच महिन्यात सादर होणार असल्याचे अर्थसंकल्पाचेही काम सुरू आहे. मात्र लेखा कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे वित्तीय अभिप्राय, धनादेश वितरण, देयके पारित करणे आदी कामे थांबली आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)या आहेत मागण्याउच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जिल्हा परिषद लेखा कर्मचाऱ्यांना राजपत्रित दर्जा मिळावा, राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे ग्रेड पे देण्यात यावे, रोजगार हमी योजना व इंदिरा आवास योजना अंतर्गत पंचायत समिती स्तरावर सहाय्यक लेखा अधिकारी पद निर्माण करण्यात यावे, लेखा लिपीक परीक्षा, उपलेखापाल परीक्षा, वित्त व लेखा (जि.प.) वर्ग ३ ची परीक्षा शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे करणे, जिल्हा परिषदेतील लेखा संर्वगीय कर्मचाऱ्यांना कनिष्ठ लेखाधिकारी तसेच लेखाधिकारी या पदावर पदोन्नती देण्यापुर्वी प्रशिक्षण देण्यात यावे, जिल्हा कोषागार कार्यालयाप्रमाणे पंचायत समिती स्तरावर लेखा विभागाचे काम करण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे.