शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

133 नवीन तलाठी साझ्यांवर अखेर अंतिम शिक्कामोर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2022 22:48 IST

 १३३ नवीन साझ्यांना शासनाने अंतिम मंजुरी दिली. मात्र या साझ्यांमध्ये अद्याप पदनिर्मिती नाही. या साझ्यांचा अतिरिक्त पदभार नवीन तलाठ्यांकडे नाही. पण तेथील संपूर्ण कारभार नजीकच्या तलाठ्यांकडे सोपविण्यात येणार नाही. त्याबाबत विशेष वेतनही मिळणार नाही, अशी अधिसूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी जारी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील महसुली गावांची संख्या वाढून तलाठी साझे कमी असल्याने प्रशासनावर मोठा ताण आला होता. राज्य शासनाने अखेर नवीन १३३ नवीन तलाठी साझे निर्माण करण्यास अंतिम शिक्कामोर्तब केले. त्यामुळे नवीन तलाठ्यांची नियुक्ती झाल्यानंतर महसुली प्रशासनावरील ताण कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील १५ तालुक्यात एकूण गावे १ हजार ८३६ गावे, ५० मंडळ आणि २९९ तलाठी साझे आहेत. वाढती लोकसंख्या आणि प्रशासकीय कामांची व्याप्ती लक्षात घेऊन २०१७ मध्ये नव्याने साझे निर्माण करण्याचा प्रस्ताव  तत्कालीन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्या कार्यकाळात राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता.  राज्य शासनाने तो प्रस्ताव मान्य केला. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात नवीन १३३ साझ्यांच्या पूनरर्चनेला मान्यता प्रदान केली.   २०१७ मध्ये मान्यता मिळाल्यानंतर अंतिम अधिसूचना प्रकाशित झाली होती. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी या अधिसूचनेची अंमलबजावणी गुरुवारी केली. आता जिल्ह्यात ४३२ तलाठी साझे निर्माण झाले आहेत. विदर्भ पटवारी संघटनेनेही यासाठी शासनाकडे पाठपूरावा केला होता. 

पदनिर्मिती होईपर्यंत नजीकच्या तलाठ्याकडे कारभार १३३ नवीन साझ्यांना शासनाने अंतिम मंजुरी दिली. मात्र या साझ्यांमध्ये अद्याप पदनिर्मिती नाही. या साझ्यांचा अतिरिक्त पदभार नवीन तलाठ्यांकडे नाही. पण तेथील संपूर्ण कारभार नजीकच्या तलाठ्यांकडे सोपविण्यात येणार नाही. त्याबाबत विशेष वेतनही मिळणार नाही, अशी अधिसूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी जारी केली आहे.

 

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागcollectorजिल्हाधिकारी