शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सिंदेवाही वनपरिक्षेत्रात १ हजार ३१३ वन्यप्राणी

By admin | Updated: May 28, 2016 01:04 IST

दरवर्षीप्रमाणे यंदाही सिंदेवाही तालुका वनपरिक्षेत्रात बुद्ध पौर्णिमेला दोन दिवस वन्यप्राण्यांची गणना करण्यात आली.

वाघ, बिबट, रानडुक्कर, चितळांची नोंदसिंदेवाही : दरवर्षीप्रमाणे यंदाही सिंदेवाही तालुका वनपरिक्षेत्रात बुद्ध पौर्णिमेला दोन दिवस वन्यप्राण्यांची गणना करण्यात आली. या दरम्यान अनेक प्रगणकांना वाघासह बिबट व अन्य प्राण्याचे दर्शन झाले. तालुक्यातील सरडपार, ठकाबाई, (गडमौशी), भिवकुंड, सिंधबोडी, राजोली, डोंगरगाव, गुंजेवाही, टेकरी, कन्हाळगाव, पवनपार, खोद, वाघडोह, काळागोटा, उमा नदी दिवान, घोट, खैरी, मरेगाव, तांबेगडी, चिकमारा, खरकाडा, सिंदेवाही, चिकमारा, वनतलाव, आदी तलावावर २४ मचानी तयार करण्यात आल्या. एका मचाणीवर चार-पाच प्रगणक व त्यांच्यासोबत एक वनरक्षक होते. वनविभागाने मचानीवर बसून प्रगणना केली. यावेळी वाघ ७, बिबट १५, अस्वल २, चांदी अस्वल १, चितळ ११६, रानडुक्कर २६७, सांबर १२, नीलगाय ४५, भेडकी २१, रानगवे २४, मुंगूस १, रानकुत्रे १७, कोल्हा ६, ससे १६, व इतर प्राणी ७६५ मिळून १ हजार ३१३ वन्य प्राण्याची नोंद करण्यात आली. इतर वन्यप्राण्यामध्ये वानर, मोर, हरिण, घुबड, लांडोर, माकड, रानकोंबडे, रोही, निलघोडा, तडस यांचा समावेश आहे. वनविभागाने वनपरिक्षेत्रात २४ पाणवठे तयार करुन त्यात प्राण्यासाठी पाण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे. मागील वर्षी सिंदेवाही वनपरिक्षेत्रात ८५० वन्यप्राणी होते. यावर्षी वन्यप्राण्याची संख्या १ हजार ३१३ झाली आहे. सिंदेवाही वनपरिक्षेत्रात अधिक प्रमाणात जंगल आहे. अनेक गावे जंगलालगत आहेत. त्यामुळे जंगल वाचविण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरु आहेत. वन विभागाकडून जंगल लगतच्या गावामध्ये कुऱ्हाडबंदी, चराईबंदी आदी उपक्रम राबविल्याने वनातील झाडामध्ये वाढ होवून वन्यप्राण्याच्या शिकारीला आळा बसला आहे. पाणवठ्यावर वन्यप्राणी पाणी पिण्याकरिता येतात. अवैध शिकारीवर आळा बसण्याकरिता पाणवठ्यावर रात्रंदिवस वनमजूर व वन कर्मचारी यांना तैनात करण्यात आले असून पाणवठे व इतर ठिकाणी जिथे वन्यप्राणी येतात, त्याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती वसंत कामडी यांनी दिली. (पालक प्रतिनिधी)