शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तूर विक्रीसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील १३०० शेतकरी वेटींगवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 14:39 IST

मागील महिन्यात नाफेडने वरोरा बाजार समिती आवारात हमी भावाने तूर खरेदी सुरू केली. मात्र खरेदीची गती अतिशय संथ असल्याने आजपर्यंत केवळ २०० शेतकऱ्यांची तूर खरेदी झाली आहे.

ठळक मुद्देवरोरा बाजार समितीनाफेडची खरेदी संथ गतीने

लोकमत न्यूज नेटवर्क

प्रवीण खिरटकरचंद्रपूर : मागील महिन्यात नाफेडने वरोरा बाजार समिती आवारात हमी भावाने तूर खरेदी सुरू केली. मात्र खरेदीची गती अतिशय संथ असल्याने आजपर्यंत केवळ २०० शेतकऱ्यांची तूर खरेदी झाली आहे. तर नोंदणी केलेले १३०० शेतकरी तूर विक्रीसाठी वेटींगवर असून मोबाईल वरील संदेशाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे.शासनाने तूर पिकाकरीता हमी भाव ५४५० रुपये प्रति क्विंटल जाहीर केला आहे. मात्र व्यापारी हमी भावापेक्षा कमी भावाने तूर खरेदी करीत असल्याने तालुक्यातील १५१४ शेतकऱ्यांनी बाजार समिती वरोरामार्फत नाफेडकडे तूर विक्रीकरीता आॅनलाईन नोंदणी केली.नाफेडने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ८ फेब्रुवारीपासून तूर खरेदीला प्रारंभ केला. ८ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीमध्ये २०७ शेतकऱ्यांची २३ हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. मात्र अद्यापही नोंदणी केलेले १३०० शेतकरी घरात तूर साठवून ठेवली आहे. त्यामुळे शेतकरी दररोज तूर विक्रीचा मॅसेजची प्रतीक्षा करीत आहेत. तर काही शेतकरी बाजार समिती कार्यालयाची पायपीट करीत आहेत.मागील वर्षी शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली व शासनाने अचानक तूर खरेदी बंद केल्याने शेतकरी धास्तावले होते. त्यानंतर आ. बाळू धानोरकर यांनी आंदोलन केले. सदर आंदोलन राज्यात चांगलेच गाजले. त्यानंतर शासनाने तूर खरेदीला सुरूवात केली होती. त्यामुळे यावर्षीसुद्धा अशाच प्रकारे तूर खरेदी शासन बंद तर करणार नाही ना, अशा प्रश्नाने शेतकऱ्यांत भीती आहे.विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचे चुकारे थकलेएक महिन्यापुर्वी दोनशे शेतकऱ्यांनी नाफेडला २३ हजार १३ क्विंटल तूर हमी भावाने विकली. परंतु, या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्यापही रक्कम जमा करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत.चणा खरेदीचा मुहर्त सापडेनाअनेकांच्या शेतातील चणा निघाला असून शासनाने ४४०० रुपये प्रति क्विंटल हमी भाव जाहीर केला आहे. बाजारात भाव कमी असल्याने शेतकरी नाफेडच्या चणा खरेदीची वाट बघत आहेत. चणा खरेदी नोंदणीकरिता शेतकऱ्यांनी अर्ज बाजार समितीमार्फत नाफेडकडे सादर केले आहे. परंतु, आजतागत नाफेडला चणा खरेदीचा मुहूर्त सापडलेला नाही.

टॅग्स :agricultureशेती