शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नऊ मीटरच्या रस्त्यासाठी १३ वर्षांचा संघर्ष

By admin | Updated: August 14, 2015 01:22 IST

बाबुपेठ परिसरातील मोटघरे प्लॉट येथे नऊ मीटरचा रस्ता टाऊन प्लॅनिंगमध्ये मंजूर झाला आहे.

मनपाकडून टोलवाटोलवी : किरमे यांचा आरोपचंद्रपूर : बाबुपेठ परिसरातील मोटघरे प्लॉट येथे नऊ मीटरचा रस्ता टाऊन प्लॅनिंगमध्ये मंजूर झाला आहे. परंतु, जागोजागी अतिक्रमण असल्याने रस्ता झाला नाही. न्यायालयाने अतिक्रमण हटवून रस्ता करण्याचे निर्देश दिले. माात्र तेरा वर्षे लोटूनही रस्ता झालेला नाही. त्यामुळे हटविलेले अतिक्रमण पुन्हा जैसे थे झाले आहे. यासाठी मनपा प्रशासनाची टोलवाटोलवीची भूमिका कारणीभूत असल्याचा आरोप गणपत किरमे यांनी पत्रकार परिषदेत केला.चांदाफोर्ट बीएनआर रेल्वेस्थानकाच्या मागील भागातील मोटघरे प्लॉट येथे काही नागरिकांनी घरे बांधून वास्तव्य सुरू केले. रेल्वेस्थानकाच्या सुरक्षाभिंतीला लागून नऊ मीटरचा रस्ता टाऊन प्लॅनिंगमध्ये मंजूर करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात रस्त्याचे काम सुरू झाले नाही. त्यामुळे गणपत किरमे यांनी २००२ मध्ये उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. न्यायालयाने २००३ मध्ये अतिक्रमण हटवून रस्ता तयार करण्याचे निर्देश दिले. परंतु तत्कालिन नगरपालिका प्रशासनाने कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे न्यायालयात अवमान याचिका दाखल केली.त्यानंतर नगरपालिकेने रस्त्यावरील अतिक्रमण हटविले. परंतु रस्त्याचे काम सुरू केले नाही. त्यामुळे आजघडीला पुन्हा नागरिकांनी अतिक्रमण केल्याने ये- जा करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा रस्ता तयार करण्यात यावा म्हणून मनपाला अनेकदा निवेदने दिली. परंतु निवेदनांची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. नगर पालिकेने अतिक्रमण हटवून रस्त्याचे काम सुरू करावे, अशी मागणी किरमे यांनी यावेळी केली.रस्त्याच्या पश्चिमेकडे रेल्वेची सुरक्षाभिंत आणि पूर्वेकडे ख्रिश्चन मिशनरीची खासगी जागा आहे. त्यामुळे एका व्यक्तीच्या अतिक्रमणाने हा रस्ता बंद आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. (शहर प्रतिनिधी)