शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

१३ लाखांचा अवैध दारूसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 00:29 IST

मागील दोन दिवसांपूर्वी गोंडपिपरी पोलिसांनी कमलाबाई लाटकर यांच्या घरातून जोगापूर येथील हरमेलसिंग डांगी याचा १० लाख ८० हजारांचा अवैध दारूसाठा जप्त केला होता.

ठळक मुद्देगोंडपिपरी पोलिसांची कारवाई : दोन्ही कारवाईतील आरोपी एकच

लोकमत न्यूज नेटवर्कगोंडपिपरी : मागील दोन दिवसांपूर्वी गोंडपिपरी पोलिसांनी कमलाबाई लाटकर यांच्या घरातून जोगापूर येथील हरमेलसिंग डांगी याचा १० लाख ८० हजारांचा अवैध दारूसाठा जप्त केला होता. या कारवाईला एक दिवस लोटत नाही तोच बुधवारी रात्री १० वाजतादरम्यान पोलिसांनी जोगापूर येथे पुन्हा धाड घालूून विठ्ठल वेलादी याच्या घरातून १२ लाख ९० हजारांचा विदेशी दारूसाठा जप्त केला. सदर दोन्ही कारवाईत हरमेलसिंग डांगी हाच आरोपी असून तो फरार असल्याची माहिती आहे.गोंडपिपरी ठाण्यात नव्याने पदभार स्वीकारणारे ठाणेदार प्रविण बोरकुटे यांनी दारू तस्करांविरुद्ध चालविलेल्या धडक मोहिमेत सलग दोन दिवसात २३ लाखांचा दारूसाठा जप्त केला असल्यामुळे नागरिकांमध्ये हा चर्चेचा विषय बनला आहे.तालुक्यात दारूबंदी अमंलबजावणीनंतर अगदी राजरोसपणे दारु विक्रीचे प्रमाण वाढले होते. अशातच येथे कार्यरत तत्कालीन पोलीस अधिकाºयांना दारुविक्री व्यवसाय व तस्करांचे वाढते साम्राज्य हा विषय गांभीर्याने न घेतल्याने दिवसेंदिवस शहरातील सामाजिक स्वास्थ बिघडत चालले होते. तर काही विक्रेत्यांनी व तस्करांनी मैत्रीपूर्ण संबंध व साटेलोट्यातून दारु तस्करीचा व्यवसायात तेजी आणली होती. मात्र येथे नव्यानेच रुजू झालेले सहा. पोलीस निरीक्षक प्रविण बोरकुटे यांनी तत्कालीन पोलिस निरीक्षक यादव यांच्या बदलीनंतर ठाण्याची सूत्रे हाती घेत दारुविक्रेत्विरुद्ध धाडसत्र राबविलेले. यात ठाणा हद्दीत २३ तर एकट्या जोगापूरात सलग दोनदा घातलेल्या धाडीत तब्बल २४ लाखांचा विदेशी दारुसाठा जप्त करण्यात आला. अहेरी- चंद्रपूर मार्गालगत वसलेल्या जोगापूर गावात मागील काही दिवसांपासून अवैध दारु तस्करी व विक्रीला उद्याण आले होते. अशातच ८ व १० आॅगस्टच्या रात्री पोलिसांनी चालविलेल्या धाडसत्रात २४ लक्ष रुपयांची आजवरची विक्रमी कारवाई केल्याने तालुक्यातील अवैध दारुविक्रेते धास्तावले आहेत. या दोन्ही कारवाईतील आरोपी जोगापूर येथील हरमेलसिंग डांगी फरार आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकेर यांच्या आदेशानुसार एसडीपीओ देशमुख यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार बोरकुटे यांचे नेतृत्वात गोंडपिपरी पोलिसांनी केली.